MPSC Result : एमपीएससी राज्यसेवा परीक्षा निकाल जाहीर, प्रमोद चौगुले सलग दुसऱ्यांदा राज्यात अव्वल

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. (MPSC Result) या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून या परीक्षेत प्रमोद चौगुले यांनी राज्यात सलग दुसऱ्यांदा पहिला क्रमांक पटकावला आहे. शुभम पाटील याने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. महिला गटात सोनाली मात्रे यांनी पहिला क्रमांक मिळवला.

प्रमोद चौगुले यांनी सलग दुसऱ्यांदा पाहिला क्रमांक मिळवला आहे. आता उमेदवारांना 3 मार्च ते 10 या कालावधीत पदासाठीचे पसंतीक्रम ऑनलाइन पद्धतीने नोंदवता येतील. पसंतीक्रमाच्या आधारे अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात येईल.

प्रमोद चौगुले यांनी 633 गुणांसह राज्यात पहिला क्रमांक पटकावला तर शुभम पाटीलला 616 गुण मिळाले आहेत. शुभम पाटील दुसरा आला आहे. (MPSC Result) मुलींमध्ये सोनाली मात्रे पहिली आहे, तर सर्वसाधारण गुणवत्ता यादीत सोनालीला तिसरा क्रमांक मिळाला आहे.

Pune News : MPSC चे विद्यार्थी पून्हा आक्रमक ; पुण्यात उद्या राज्यव्यापी आंदोलन

उपजिल्हाधिकारी, पोलीस उपाधिक्षक, तहसीलदार सह एकूण 20 पदांच्या 405 जागांसाठी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. (MPSC Result) या निकालाची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच संवर्गाचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता 3 मार्च 2023 ते 10 मार्च 2023 या कालावधीत वेब लिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे, अशी माहिती आयोगाने दिली आहे.

आयोगाने 405 पदांसाठी 7, 8 व 9 मे 2022 रोजी मुख्य परीक्षा घेतली होती. सदर परीक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर करण्यात आला. प्रमोद चौगुले हा 2020 च्या परीक्षेतही राज्यात प्रथम आला होते, त्यावेळी त्यांची निवड जिल्हा उद्योग अधिकारी या पदी झाली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.