Today’s Horoscope 02 January 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग -Today’s Horoscope 02 January 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – मंगळवार.

तारीख 02.01.2024.

शुभाशुभ विचार- 17  प. चांगला दिवस.

आज विशेष – साधारण दिवस.

राहू काळ – दुपारी 3.00 ते 4.30.

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आज नक्षत्र – पूर्वा फाल्गुनी 11.42 पर्यंत नंतर उत्तरा फाल्गुनी.

चंद्र राशी – सिंह 18.29 पर्यंत नंतर कन्या.

—————————–

मेष – ( शुभ रंग – राखाडी)

तरुण वर्गाचा आज मौजमजा करण्याकडे कल असेल. स्वतःची हौस भागवण्यासाठी खर्च कराल. गृहिणी आज स्वतःसाठी वेळ काढतील. प्रकृती उत्तम साथ देईल.

वृषभ – ( शुभ रंग- पांढरा)

मुलांची अभ्यासात उत्तम प्रगती दिसून येईल. गृहोद्योग चांगले चालतील. गृहिणींना थोडा थकवा जाणवेल. आज नोकरदारांना ऑफिसला दांडी मारायचा मूड असेल.

मिथुन – ( शुभ रंग- केशरी)

साहित्यिक मंडळींकडून दर्जेदार लिखाण होईल. गायक कलाकार प्रसिद्धीच्या झोतात येतील. गृहिणी शेजार धर्म जपतील बेरोजगारांना नोकरीचे कॉल्स येतील.

कर्क – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

आज तुम्ही कार्यक्षेत्रात यशस्वी नेतृत्व कराल. व्यवसायात आवक मनासारखी राहील. नोकरीच्या ठिकाणी एखादी वाढीव जबाबदारी स्वीकारावी लागेल. आज यशदायी दिवस आहे.

सिंह -( शुभ रंग – चंदेरी)

आज कुठेही आपलीच मर्जी चालवण्याचा तुमचा प्रयत्न असेल. आपला मोठेपणा सांभाळण्यासाठी खर्च कराल. फारच सडेतोड बोलून कुणाच्या भावना दुखावू नका.

कन्या – ( शुभ रंग- जांभळा)

विदेशाशी संबंधित व्यवसाय उत्तम चालतील. अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढेल. कार्यालयीन कामासाठी दुरचे प्रवास घडतील. आज प्रवासात आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

तूळ – ( शुभ रंग- आकाशी)

व्यावसायिक उलाढाल वाढेल. आप्तस्वकीय व जिवलग मित्र तुमच्या शब्दाला मान देतील. नवविवाहितांची स्वप्ने साकार होतील. दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित लाभ होतील.

वृश्चिक – ( शुभ रंग – गुलाबी)

कार्यक्षेत्रात वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी सज्ज राहावे लागेल. अधिकारी वर्गाला अधिकार वापरावेच लागणार आहेत. तरुणांनी कुसंगती पासून लांबच राहिलेले बरे.

धनु – (शुभ रंग- आकाशी)

नोकरदारांना वरिष्ठांची मर्जी सांभाळणे अवघड जाईल. उद्योगधंद्याच्या दृष्टीने काहीसा प्रतिकूल दिवस असून आज नास्तिक ही देवाला एखादा नवस बोलतील.

मकर- ( शुभ रंग – पिस्ता)

विवाह विषयक बोलणी आज करू नका. जास्त लाभाच्या आशेने कुठेही असुरक्षित गुंतवणूक करू नका. आज धाडसाची कामे टाळावीत. झटपट लाभाचा मोह तर अजिबात नको.

कुंभ – (शुभ रंग- मोतिया)

व्यवसायात वाढत्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी तयार राहावे लागेल. कार्यक्षेत्रात काही आव्हानात्मक प्रसंगांना तोंड द्यावे लागणार आहे. पत्नीचे सल्ले मात्र डावलू नका.

मीन – ( शुभ रंग- निळा)

नोकरदारांसाठी अनुकूल दिवस. वरिष्ठ आज तुमच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करतील. तुमची काही आणि असतील तर ती वसूल होण्याची शक्यता आहे.

श्री जयंत कुळकर्णी.

ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.

फोन – 9689165424.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.