Chinchwad : पिंपरी चिंचवड शहरात मकोका कारवाईचे अर्धशतक

एमपीसी न्यूज – नव वर्षाचे स्वागत शांततेत होण्याकरिता डिसेंबर (Chinchwad) अखेरीस पिंपरी-चिंचवड मधील 12 संघटीत गुन्हेगारी टोळयामधील एकूण 60 आरोपीवर मकोका कायदयांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत मागील वर्षभरात 51 संघटीत गुन्हेगारी टोळ्यांमधील एकूण 357 आरोपींवर मकोका कायदयांतर्गत कारवाई झाली असून, मकोका पॅटर्नचे अर्धशतक पूर्ण झाले आहे.

वाकड मधील आरोपी रोहन ऊर्फ गंग्या वासुदेव वाघमारे (टोळी प्रमुख वय 28, रा. चौधरी पार्क, वाकड), चाकण मधील (Chinchwad) आरोपी शुभम युवराज सरोदे (टोळी प्रमुख वय 21, रा.नाणेकरवाडी, चाकण), निगडी मधील आरोपी मोहम्मद ऊर्फ मम्या मेहबुब कोरबु (टोळी प्रमुख वय 28, रा. आझाद चौक, ओटास्कीम, निगडी), पिंपरी मधील आरोपी प्रकाश ऊर्फ डब्बल सुरेंद्र राम (टोळी प्रमुख वय 30, रा. बौध्द नगर, पिंपरी), तसेच आरोपी आकाश ऊर्फ जिलब्या यादव गायकवाड (टोळी प्रमुख वय 26, रा. महात्मा फुले नगर, चिंचवड),

सांगवी मधील आरोपी आनंद सुनिल साळुंके उर्फ लोहार (टोळी प्रमुख वय 19, रा. कमीला चाळ, खडकी), निगडी मधील आरोपी लखन ऊर्फ बबलू अवधुत शर्मा (टोळी प्रमुख वय 19, रा. पांढारकर चाळ, दळवीनगर, चिंचवड), भोसरी मधील आरोपी अक्षय नंदकिशोर गवळी (टोळी प्रमुख वय 28, रा. गवळी वाडा, खडकी), सांगवी मधील आरोपी आनंद सुनिल साळुंके उर्फ लोहार (टोळी प्रमुख वय 19, रा. कमीला चाळ,महादेवनगर, खडकी), अक्षय ऊर्फ जोग्या हेमंत जाधव (टोळी प्रमुख वय 25, रा. जुनी सांगवी),

Today’s Horoscope 02 January 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

चिखली मधील आरोपी मन्नु ऊर्फ अतिष बलदेव कोरी (टोळी प्रमुख वय 21, रा. गोकुळधाम सोसा, घरकुल चिखली), सांगवीतील आरोपी आनंद सुनिल साळुंके उर्फ लोहार (टोळी प्रमुख वय 19, रा. कमीला चाळ, महादेवनगर, खडकी) आणि या सर्व टोळी प्रमुखांचे साथीदार यांच्यावर गंंभीर गुन्हे नोंद केल्याची आढळून आले होते. त्यामुळे या सर्वांवर कारवाई करण्यात आली आहे.

वरील सर्वांनी गेल्या काही वर्षात अवैध मार्गाने आर्थिक फायदा मिळवण्याचे उद्देशाने स्वत:चे गुन्हेगारी वर्चस्व व दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली होती. टोळी प्रमुख म्हणुन किंवा संघटनेच्या वतीने एकटयाने किंवा संयुक्तपणे, हिंसाचाराचा वापर करुन अथवा हिंसाचाराची धमकी देवुन किंवा धाक दपटशहा दाखवुन टोळी प्रमुख व साथीदार यांनी खून, खूनाचा प्रयत्न,

सदोष मनुष्यवध करण्याचा प्रयत्न करणे, दरोडा, जबरी चोरी,अप्रमाणिकपणे चोरीची मालमत्ता स्विकारणे, तोडफोड करणे, विनयभंग, अपहरण, खंडणी, दरोडा, दंगा करणे, अश्लिल वर्तन करणे, जिवे ठार मारण्याची धमकी देणे, बेकायदेशीररित्या घातक शस्त्रे जवळ बाळगणे असे अनेक गंभीर गुन्हे या सर्वांवर दाखल आहेत. महत्वाचे म्हणजे या आरोपींवर दाखल गंभीर गुन्ह्यांचा आलेख हा चढता राहिला आहे.

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी शहरात, शरिराविरुध्दचे व मालाविरुध्दचे गुन्हे करणारे आणि लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांच्यावर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर वरील आरोपींवर शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या (Chinchwad) अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.