Chinchwad : मद्य प्राशन करून वाहने चालवणाऱ्या 322 तळीरामांवर कारवाई

एमपीसी न्यूज – वर्षाचा शेवटचा दिवस साजरा करण्यासाठी (Chinchwad) अनेकांनी मदिरा सेवनास प्राधान्य दिले. मात्र त्यानंतर वाहन न चालवण्याचा नियम मात्र ते तळीराम विसरले. पण 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी मात्र शहरात ठीक ठिकाणी नाकाबंदी लावली होती. या नाकाबंदीमध्ये रात्रभरात 322 तळीराम मदिरा सेवन करून वाहन चालवताना आढळून आले. त्यांच्यावर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे.

नववर्ष स्वागतासाठी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. यात हाॅटेलसह माॅल, बाजारपेठेत मोठी गर्दी झाली. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी रविवारी (दि. 31) सायंकाळपासून मोठा बंदोबस्त तैनात केली होता. बंदोबस्तासाठी अडीच हजार पोलिस रस्त्यावर उतरले होते. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्याकडून सातत्याने आढावा घेण्यात येत होता. स्थानिक पोलीस ठाणे तसेच गुन्हे शाखेच्या विविध पथकांकडून गस्त घालण्यात आली. तसेच शहरात 40 ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली. नववर्षाचे स्वागत करताना रस्त्यावर गोंधळ घालणाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाई केली. रात्री उशिरापर्यंत नियमांचे उल्लंघन करून ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवरही कारवाई केली.

पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेकडून मुख्य चौक, अंतर्गत रस्ते तसेच महामार्गांवर(Chinchwad) ठिकठिकाणी वाहन चालकांची तपासणी करण्यात आली. यातील मद्यपी चालकांवर कारवाई केली. पोलीस आयुक्तालयांतर्गत हाॅटेल, ढाब्यांसह विविध 473 आस्थापनांची पोलिसांकडून पाहणी करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात आली.

Chinchwad : पिंपरी चिंचवड शहरात मकोका कारवाईचे अर्धशतक

पोलिस आयुक्तालयांतर्गत रेकाॅर्डवरील तसेच विविध गुन्हे दाखल असलेल्या संशयितांची तपासणी करण्यात आली. यात रविवारी रात्री 415 संशयितांना चेक करून आढावा घेण्यात आला. बंदोबस्त तसेच नाकाबंदी दरम्यान संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली. पोलिस आयुक्तालयांतर्गत रविवारी अशा संशयित 2425 वाहनांची पोलिसांनी तपासणी केली. यात बेशिस्त वाहनचालकांना 20 लाख 60 हजार 800 रुपयांचा दंड आकारला.

नववर्षाचे स्वागत करण्यासाठी जुगार अड्डा चालविण्यात येत होता. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करून जुगाराचा डाव उधळून लावला. तसेच अवैध दारू निर्मिती व विक्री प्रकरणी देखील कारवाई केली. यात एक जुगार अड्डा तसेच अवैध दारु प्रकरणी पाच कारवाया करण्यात आल्या. या कारवाईत पोलिसांनी दोन लाख नऊ हजार 875 रुपयांचा मुद्देमाल (Chinchwad) जप्त केला.

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी रविवारी केलेली कारवाई
ड्रंक अँड ड्राईव्ह – 322
संशयित चेकिंग – 415
वाहने चेकिंग – 2425
अवैध धंदे कारवाई – 10
आस्थापना चेकिंग – 473
अवैध धंदे कारवाईमधील जप्त मुद्देमाल – 2 लाख 9 हजार 875
वाहनांवर केलेल्या कारवाईचे दंडाची रक्कम – 20 लाख 60 हजार 800

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.