Today’s Horoscope 07 July 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 07 July 2023
वार – शुक्रवार.
07.07.2023
शुभाशुभ विचार- उत्तम दिवस.
आज विशेष- सामान्य दिवस.
राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आजचे नक्षत्र – शततारका 22.16 पर्यंत नंतर पूर्वा भाद्रपदा.
चंद्र राशी – कुंभ.
—————————————-
मेष  ( शुभ रंग- सोनेरी )
आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस. जे जे चिंतल ते ते होईल कमी श्रमात ही जास्त लाभ पदरात पडण्याची शक्यता आहे. आज जिवलग मित्र तुमचा शब्द झेलतील.

वृषभ (शुभ रंग- राखाडी)
कार्यक्षेत्रात ध्येयाच्या दिशेने तुमची वेगाने घोडदौड चालू आहे. आज यशस्वी लोकांच्या सहवासात तुमच्याही महत्त्वकांक्षा वाढतील. कुसंगती पासून लांबच रहाल तर बरे.

मिथुन ( शुभ रंग- हिरवा)
आज तुम्हाला दैवाचे पाठबळ उत्तम असल्याने तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यशाची खात्रीच बाळगा. सज्जनांचा सहवास लाभेल. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल.

कर्क (शुभ रंग- आकाशी)
कोणतीही धाडसाची कामे आज नकोत. स्वतःला जपा. आज कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. विश्वासातील व्यक्तींकडूनच विश्वासघात होऊ शकतो.

सिंह (शुभ रंग- चंदेरी )
कौटुंबिक वातावरण सामंजस्याचे असल्याने तुम्ही आज घराबाहेरही आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवू शकाल. जोडीदारास अभिमानास्पद वाटणारी कामगिरी आज तुमच्याकडून होईल.

कन्या ( शुभ रंग- क्रीम )
कुठलीच गोष्ट आज सहज साध्य नसली तरीही तुमच्या प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ नक्कीच मिळेल. काही येणी असतील तर ती वसूल होण्याची शक्यता आहे.
आज किरकोळ दुखणे ही अंगावर काढू नका.

तूळ ( शुभ रंग- निळा)
हौशी मंडळी जीवाची मुंबई करतील. आज मनसोक्त स्वतःचे लाड पुरवण्यासाठी पैसा व वेळही खर्च कराल. गुढ शास्त्रांच्या अभ्यासकांना एखादी प्रचिती येईल.

वृश्चिक (शुभ रंग- पांढरा)
आज तुम्ही काही घरगुती प्रश्नात लक्ष घालणे गरजेचे आहे. उद्योग करणाऱ्या महिलांची आवक वाढेल. आज तुम्हाला मुलांच्या अभ्यासात लक्ष द्यावे लागणार आहे. आईचे मन दुखावू नका.

धनु (शुभ रंग- गुलाबी)
आज नोकरदरांना बढती बदली विषयी काही समाचार येऊ शकतात. मुले आज अभ्यासात चालढकलच करतील. गृहिणीनी सासूबाई कडून शाब्बासकीची अपेक्षा करूच नये.

मकर ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज तुमच्या खिशात पैसा खेळता असल्याने आनंदी व उत्साही असाल. काही हवेहवेसे वाटणारे पाहुणे घरी पायधुळ झाडतील. महत्त्वाच्या चर्चेत वाद टाळून सुसंवाद साधावा.

कुंभ (शुभ रंग – डाळिंबी )
आज स्वतःचेच खरे करू नका इतरांचेही ऐकून घेण्याची मानसिकता ठेवा. व्यावसायिकांनी स्पर्धकांना कमजोर समजून चालणार नाही. आज तुम्ही गोडबोल्या मंडळींपासून सावध असावे.

मीन (शुभ रंग – भगवा)
संध्याकाळी एखाद्या मॉलमध्ये फेरफटका माराल. आज दिवस खर्चाचा आहे, बचतीचा विचार सोडून द्या. आज तुम्ही यथाशक्ती दानधर्मही कराल. थोरांशी वाद टाळावेत. (Today’s Horoscope 07 July 2023)

शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क *9689165424*

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.