Today’s Horoscope 11 January 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग -Today’s Horoscope 11 January 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – गुरूवार.

तारीख 11.01.2024.

शुभाशुभ विचार – अमावास्या वर्ज्य.

आज विशेष – दर्श वेळा अमावस्या.

राहू काळ – दुपारी 01.30  ते 3.00.

दिशा शूल – दक्षिणेस असेल.

आज नक्षत्र – पूर्वाशाढा 17.39 पर्यंत नंतर उत्तरा शाढा.

चंद्र राशी – धनु 23.05 पर्यंत नंतर मकर.
—————————–
मेष – ( शुभ रंग – जांभळा)
आज सज्जनांच्या सहवासात चांगली वैचारिक देवाण-घेवाण होईल. तुमचे विचार प्रगल्भ होतील. कार्यक्षेत्रात काही किरकोळ अडचणींचा सामना आज करावा लागेल.

वृषभ – ( शुभ रंग- राखाडी)

कार्यक्षेत्रात कोणतीही धाडसाची कामे आज नकोत. आर्थिक व्यवहार मर्यादेबाहेर करू नका. गोडबोल्या मंडळींपासून दूरच रहा. झटपट लाभाचा मोह टाळायला हवा. स्वतःवर संयम ठेवा.

मिथुन – ( शुभ रंग- सोनेरी)
कौटुंबिक जीवनात सुसंवाद असल्याने तुम्ही आज घराबाहेरही आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवू शकाल. अडचणीच्या प्रसंगी आज पत्नीची तुम्हाला खंबीर साथ असेल.

कर्क – ( शुभ रंग – निळा)
अगदी किरकोळ वाटणाऱ्या कामातही ऐनवेळी काही अडचणी उभ्या राहतील. ध्येयप्राप्तीसाठी चालू असलेल्या तुमच्या अथक प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ नक्की मिळणार आहे.

सिंह -( शुभ रंग – चंदेरी)
कला क्षेत्रातील मंडळींना आज रसिक मनसोक्त दाद देतील. आज स्वतःचे छंद जोपासण्यासाठी वेळ व पैसाही खर्च करू शकाल. मौजमजा करताना कायद्याचे बंधन पाळा.

कन्या – ( शुभ रंग- भगवा)
आज गृहिणी घर स्वच्छतेचे मनावरच घेतील. काहीजण सहकुटुंब प्रवासाला निघतील. आज प्रवासात नवे हितसंबंध जुळून येतील. वाणीत मात्र गोडवा असू द्या.

तूळ – ( शुभ रंग- क्रीम)
विविध मार्गाने आलेला पैसा विविध मार्गाने जाईल. आज तुम्ही गरजूंनाही मनापासून मदतीचा हात द्याल. आज सामाजिक कार्यकर्त्यांना समाजात मान मिळेल.

वृश्चिक – ( शुभ रंग – डाळिंबी)
खर्च कितीही वाढला असला तरी तुमची काही येणी असतील तर ती मात्र आज अकस्मिकपणे वसूल होतील, त्यामुळे पैशाची कमतरता भासणार नाही नेतेमंडळी आज सभा गाजवतील.

धनु -(शुभ रंग- पांढरा)
आजचा दिवस तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल आहे. सर्व कामे विना व्यत्यय पार पडतील. उपवारांना आज सुयोग्य स्थळांचे प्रस्ताव येतील. विरोधक नमतेच घेतील.

मकर- ( शुभ रंग – हिरवा)

कौटुंबिक वाढत्या गरजा भागवताना थोडीफार तारेवरची कसरत होईल पण तुम्ही निभावून न्याल. काही जणांना अनपेक्षित पणे दूरचे प्रवास घडणार आहेत.

कुंभ – (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून तुमच्या काही अपुऱ्या स्वप्नांची पूर्तता होणार आहे. सकारात्मक राहून आजचा दिवस सत्कारणी लावा. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व.

मीन ( शुभ रंग- मोतिया)
उच्च अधिकारी वर्गास अधिकार वापरण्याची वेळ येईल. नोकरीत प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. आज फक्त आपल्या कर्तव्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे. अति व्यस्त दिवस.

 

श्री जयंत कुळकर्णी.
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.
फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.