Pimpri : विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर ठाकरे गटाकडून रास्ता रोको

एमपीसी न्यूज  – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना पात्र करत शिवसेना त्यांना ( Pimpri ) देण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी  दिल्यानंतर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.  शिवसैनिकांनी बुधवारी रात्री नऊच्या सुमारास पिंपरीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको आंदोलन केले. तसेच शिंदे आणि भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला.

Pune : अखेर शिवसेना एकनाथ शिंदेंचीच! निकालाचे आतिषबाजी करीत पुण्यात जल्लोषात स्वागत

बुधवारी सायंकाळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार पात्र असून शिवसेना ही शिंदे यांची असल्याचा निर्णय दिला. या निर्णयानंतर राज्यात ठिकठिकाणी शिवसैनिक रस्त्यावर उतरले असून सरकारचा जोरदार निषेध केला जात आहे.

या आंदोलनात शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले, मावळ लोकसभा मतदारसंघाचे संघटक संजोग वाघेरे, युवा अधिकारी चेतन पवार, रोमी संधू, अमोल निकम, अनंत को-हाळे ,अनिता तुतारे, निलेश मुटके, वैशाली मराठे, माजी नगरसेविका मीनल यादव, रजनी वाघ, ज्योती वाघ, तुषार नवले, राजू सोलापुरे, दादा नरळे, राजेंद्र सिंग राठोड, प्रवीण राजपूत, बाळासाहेब वरे, संजय दुर्गुळे, भरत पाटील आदी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

‘जय भवानी जय शिवाजी’, ‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ यांचा विजय असो’, ‘उध्दव साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘ या ‘गद्दारांचे करायचे काय, खाली डोके वर पाय’,’पन्नास खोके, एकदम ओके, आवाज कोणाचा शिवसेनेचा’, अशी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. तसेच यावेळी शिवसैनिकांनी मुंबई-पुणे महामार्गही काही काळ रोखला ( Pimpri ) होता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.