Today’s Horoscope 13 August 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 13 August 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – रविवार.

13.08.2023.

शुभाशुभ विचार- 8.00 पर्यंत चांगला दिवस.

आज विशेष- प्रदोष.

राहू काळ – संध्याकाळी 4.30 ते 6.00.

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आजचे नक्षत्र -आर्द्रा 8.26 पर्यंत नंतर पुनर्वसू.

चंद्र राशी – मिथुन.

—————————————-

मेष – ( शुभ रंग-  )

आज तुम्ही इतरांना मदत करण्यासाठी स्वतःचा वेळ व पैसा खर्च कराल. घर दुरुस्तीच्या काही कामात लक्ष घालावे लागणार आहे. सामाजिक कार्यकर्त्यांना लोकप्रियता मिळेल

वृषभ (शुभ रंग- पिस्ता )

आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असल्याने तुम्हाला प्रत्येक कामात चांगला उत्साह जाणवेल. लहान भावास आज तुमच्या मदतीची गरज भासेल.

मिथुन ( शुभ रंग- डाळिंबी )

आज तुम्ही काहीसे हट्टीपणाने वागाल. अति स्पष्ट बोलल्याने आपलीच माणसे दुखावली जाण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक आवक जरी चांगली असली तरीही पैशाची उधळपट्टी करू नका.

कर्क (शुभ रंग- जांभळा.)

पैसा येण्याआधीच पैसा जाण्याचे मार्ग तयार असतील. दूरच्या प्रवासात आपल्या किमती वस्तू सांभाळा. घरात पूर्वी हरवलेली एखादी वस्तू आज संध्याकाळी पुन्हा शोधल्यास सापडेल.

सिंह (शुभ रंग- गुलाबी )

आज तुम्ही अगदी सहजच घेतलेले निर्णयही योग्य ठरतील. मित्र आज तुम्हाला दिलेली आश्वासने पाळतील. महत्त्वाचे आर्थिक व्यवहार दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून टाका.

कन्या ( शुभ रंग- आकाशी)

उच्चशिक्षित तरुणांना आज मनासारख्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. निर्णय घ्यायला मात्र विलंब लावू नका. आज मित्र तुम्हाला दिलेला शब्द पाळतील छान दिवस आहे.

तूळ ( शुभ रंग- गुलाबी)

ऑफिसमध्ये अधिकारी वर्गास आज काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. अविश्रांत मेहनतीच्या जोरावर तुमची ध्येयाकडे वाटचाल चालूच राहील. कायद्याची चौकट मात्र मोडू नका.

वृश्चिक (शुभ रंग- मोरपिशी)

कार्यक्षेत्रात मनाविरुद्ध घडलेल्या काही घटना तुम्हाला बेचैन करतील. आज अधिकाऱ्यांशी नमते घ्या व सहकाऱ्यांशी जुळवून घ्या. आज तुम्हाला सासुरवाडी कडून लाभ संभवतो.

धनु- (शुभ रंग- निळा)

आज तुम्ही आपल्या मर्यादित रहा. अति आक्रमकतेने नुकसान होईल. संध्याकाळी वाहन चालवताना काळजी घ्या. मुलांनी कुसंगती पासून लांब राहावे, पालक तुम्हाला हिताचेच सल्ले देतील.

मकर ( शुभ रंग- जांभळा )

कार्यक्षेत्रात आज काही पेच प्रसंगांचा सामना करावा लागू शकतो. वैवाहिक जीवनात सौम्य मतभेद असतील. भागीदारीच्या व्यवहारात पारदर्शकता ठेवा. जोडीदाराच्या चुका काढण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही.

कुंभ (शुभ रंग – लाल)

महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून या रुग्णांना असाध्य आजारावर योग्य डॉक्टर सापडेल. मुलांची शैक्षणिक प्रगती पाहून तुम्ही आनंदी व्हाल.

मीन -(शुभ रंग – लेमन )

आज तुम्ही कुटुंबीयांना पुरेसा वेळ देण्याचा प्रयत्न कराल. भावनेच्या भरात कोणालाही वचने देऊन अडकू नका. हाती असलेला पैसा जपून वापरा मुलांचे ही अति लाड थांबवा.

शुभम भवतु 

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क – 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.