Today’s Horoscope 13 July 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 13 July 2023 

वार – गुरुवार.

13.07.2023

शुभाशुभ विचार – कृत्तिका वर्ज्य. 

आज विशेष- कामिका एकादशी.

राहू काळ – दुपारी 1.30  ते 3.00. 

दिशा शूल – दक्षिणेस असेल.

आजचे नक्षत्र – कृतिका 20.52 पर्यंत नंतर रोहिणी.

चंद्र राशी – वृषभ.

———————————–

मेष – ( शुभ रंग- क्रीम )

आज तुमच्या खिशात पैसा खेळता असल्याने तुम्हाला प्रत्येक कामात चांगला उत्साह वाटेल. आज कदाचित लहान भावास मदत करावी लागेल. प्रवासात थोडाफार खोळंबा संभवतो.

वृषभ (शुभ रंग- तांबडा )

आज तुम्ही हट्टीपणाने वागाल. अति स्पष्टवक्ते पणाने जवळची माणसे दुखावली जाण्याची शक्यता आहे. आर्थिक आवक चांगली असली तरी पैसा जपून वापरायला हवा.

मिथुन ( शुभ रंग- पांढरा )

विविध मार्गाने येणारा पैसा विविध मार्गाने जाईल. दूरच्या प्रवासात आपल्या किमती वस्तूंची काळजी घ्या. आज परदेशाशी संबंधित असलेले व्यवसाय चांगले चालतील.

कर्क (शुभ रंग- राखाडी)

आज तुम्ही अगदी सहजच घेतलेले निर्णयही योग्य ठरतील. मित्र दिलेली आश्वासने पाळतील. महत्त्वाचे आर्थिक व्यवहार दिवसाच्या पूर्वार्धातच उरकणे गरजेचे आहे.

Pimpri : गुरुवारी संत तुकाराम महाराज पालखी शहरात; वाहतुकीत बदल

सिंह (शुभ रंग- हिरवा )

उच्चशिक्षित मंडळींना आज मनासारख्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. निर्णय घ्यायला मात्र विलंब लावू नका. आज मित्र तुम्हाला दिलेला शब्द पाळतील. छान दिवस.

कन्या ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी) – Today’s Horoscope 13 July 2023 

ऑफिसमध्ये अधिकारी वर्गास काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. अविश्रांत मेहनतीच्या जोरावर आज तुमची ध्येयाकडे यशस्वी वाटचाल सुरू असेल. कायद्याची चौकट मात्र मोडून चालणार नाही.

तूळ ( शुभ रंग- चंदेरी)

कार्यक्षेत्रात घडलेल्या काही मनाविरुद्ध घटनांनी तुम्हाला नैराश्य येईल. आज वरिष्ठांशी नव्हते घ्या व सहकाऱ्यांशी जुळवून घ्या. मित्रांना मात्र आज दुरून रामराम केलेल्या बरा.

वृश्चिक (शुभ रंग- सोनेरी)

आज जरा आपल्या मर्यादेत रहा. अति आक्रमकतेने नुकसान होईल. संध्याकाळी वाहन चालवताना जरा जपून. मुलांनी कुसंगती पासून लांबच राहावे. पालक हिताचे सांगत असतील.

धनु- (शुभ रंग- पिस्ता)

कार्यक्षेत्रात काही आव्हान देणारे पेच प्रसंग सोडवावे लागतील. वैवाहिक जीवनात सौम्य मतभेद असतीलच. भागीदारीत आर्थिक व्यवहार लिखित स्वरूपात करावेत.

मकर ( शुभ रंग- चंदेरी )

महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धात उरकून घ्या. आज रुग्णांना असाध्य आजारावर योग्य उपाय सापडतील. मुलांची शैक्षणिक प्रगती पाहून पालक आनंदी होतील.

कुंभ (शुभ रंग – आकाशी)

आज तुम्हाला तुमची खोटी स्तुती करणारे मित्र भेटतील. हाती असलेल्या पैसा जपून वापरा. भावनेच्या भरात कोणालाही वचने देऊ नका मुलांचे अति लाड थांबवा.

मीन -(शुभ रंग- निळा )

नोकरीच्या ठिकाणी अथक परिश्रमाचे फळ मिळेल. सामाजिक कार्यकर्त्यांना लोकप्रियता मिळेल. कुटुंबीयांस अभिमानास्पद वाटेल अशी कामगिरी आज तुमच्या हातून होईल.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.