Pimpri : गुरुवारी संत तुकाराम महाराज पालखी शहरात; वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज – आषाढी सोहळा पार पडल्यानंतर संत तुकाराम महाराजांची पालखी परतीचा प्रवास करत आहे. पालखी गुरुवारी (दि. 13) पिंपरी (Pimpri ) चिंचवड शहरात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

Chhajed Parivar Mandal : अ. भा. छाजेड परिवार  मंडळाची कार्यकारिणी बरखास्त, तीन महिन्यात नव्याने निवडणूक घेण्याचे आदेश

भोसरी वाहतूक विभाग

जुना पुणे मुंबई हायवेवरील नाशिक फाटाकडून पिंपरी बाजूकडे सर्व अवजड वाहनांस प्रवेश बंदी. पर्यायी मार्ग – वरील मार्गावरील सर्व जड अवजड वाहने नाशिक फाटा येथून उजवीकडे वळून भोसरी मार्गे इच्छित स्थळी जातील. नाशिक फाटा येथून डावीकडे वळून सांगवी मार्गे इच्छित स्थळी जातील.

 

पिंपरी वाहतूक विभाग

पिंपरी पुल (पिंपरी पुलावरुन शगुन चौकाकडे किंवा भाटनगरकडे येणारे वाहनांचा रस्ता बंद करण्यात येणार आहे) पालखी भाटनगरपासून स्मशानभूमी पिंपरीकडे जाईपर्यंत वाहतुक बंद करण्यात येत आहे. हनुमान मंदीर चौक (पिंपरी गावाकडे येणारी वाहतूक अवजड वाहने मदर टेरेसा उड्डाणपुलावरुन काळेवाडी मार्गे. पिंपरी गावाकडे येणारी व पिंपरी गावातुन बाहेर पडणारी वाहतूक डेअरी फार्म व साई चौक भुयारी मार्गे. भाटनगर कडून येणारी पिंपरी गावाकडे येणारी वाहतूक रिव्हर रोड कराची चौक साई चौक मार्गे पिंपरी गावाकडे.

 

साई चौकाकडून शगुन चौकाकडे येण्यास जड वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे. काळेवाडी पुलाकडून डिलक्स चौकाकडे येण्यास जड वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.

 

चिंचवड वाहतूक विभाग

महावीर चौकाकडून खंडोबामाळ, निगडीकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग महावीर चौक ते चाफेकर ब्रिज मार्गे इच्छित स्थळी जातील.

 

चापेकर चौक एल्प्रो मॉलकडून लिंकरोडला जाणारा रोड सर्व प्रकारच्या जड / अवजड वाहनासाठी बंद राहील. (ही वाहने अहिंसा चौक येथून डावीकडे वळून महावीर चौकाकडून इच्छित स्थळी जातील)

 

मोरया हॉस्पिटल चौक लिंकरोड कडून चिंचवड गावाकडे येणारी जड / अवजड वाहनांना प्रवेश बंद राहील. पर्यायी रस्ता – मोरया हॉस्पिटल चौक गांधीपेठ मोरया गोसावी मंदिर कडून रिव्हर या चौकाकडून इच्छित स्थळी जाता येईल.

 

एस. के. एफ. चौक चिंचवड मार्गाने खंडोबा माळ चौकाकडे जाणारे जड़ / अवजड वाहनांना प्रवेश बंद राहील. पर्यायी रस्ता – सदरची वाहने ही बिजलीनगर चौक मार्गाने इच्छित स्थळी जातील.

 

निगडी वाहतूक विभाग

खंडोबामाळ चौकाकडून टिळक चौकाकडे जड वाहनांना प्रवेश बंदी. पर्यायी मार्ग – खंडोबा माळ चौकातून डावीकडे वळून चिंचवड स्टेशन- महावीर चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.

 

त्रिवेणीनगर चौकाकडून भक्ती शक्ती चौकाकडे जाण्यास जड / अजवड वाहनांना प्रवेश बंदी. पर्यायी मार्ग – त्रिवेणीनगर चौक- दुर्गानगर चौक मार्गे थरमॅक्स चौकमार्गे इच्छित स्थळी जातील.

 

देहूरोड वाहतूक विभाग

मुंबई-पुणे जुना हायवे वरील सेंट्रल चौकातून कमान येथून देहूकडे व भक्तीशक्ती चौकाकडे जाणाऱ्या जड / अवजड वाहनांना प्रवेश बंदी. पर्यायी मार्ग – सर्व प्रकारची वाहने सेंट्रल चौक मामुर्डी किवळे भुमकर चौक डांगे – चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.

 

तळवडे वाहतूक विभाग

खंडेलवाल चौक ते देहुकमान परंडवाल चौक साईराज हॉटेल चौक दरम्यान जड अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग – कॅनबे चौक- तळवडे गावठाण त्रिवेणीनगर-भक्ती शक्ती चौक मार्गे इच्छित स्थळी जातील

 

देहुगाव रिंग रोड दरम्यान जड अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.  पालखी पिंपरी (Pimpri )चिंचवड शहरात दाखल झाल्यापासून मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत वेळोवेळी हे बदल करण्यात येणार आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.