Today’s Horoscope 14 July 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ
एमपीसी न्यूज - आजचे पंचांग वार – बुधवार दि. 14 जुलै 2021
- शुभाशुभ विचार -13 नंतर चांगला दिवस.
- आज विशेष – सामान्य दिवस.
- राहू काळ – दुपारी 12.00 ते 1.30.
- दिशा शूल – उत्तरेस असेल.
- आजचे नक्षत्र – पूर्वा.फाल्गुनी.
- नक्षत्र पाया- चांदी
- चंद्र राशी – सिंह.
—————————————
मेष – ( शुभ रंग -मोतिया )
व्यवसायात नवीन हितसंबंध तयार होतील. स्थावराचे व्यवहार मनाप्रमाणे होतील. आज तुमची तब्येत उत्तम असेल. नवोदित कलाकारांना ग्लॅमर मिळेल.
वृषभ – ( शुभ रंग -सोनेरी )
आज तुमचे मनोबल उत्तम असेल. इतरांस अशक्य ते शक्य करून दाखवायची जिद्द बाळगाल. विरोधक तुमचा नाद सोडून देतील. जागे विषयी प्रश्न सुटतील.
मिथुन – ( शुभ रंग -केशरी )
कार्यक्षेत्रातील काही अडचणी सोडवण्यासाठी तुमच्या जुन्या ओळखी आज कामी येतील. गृहिणींना माहेरची ओढ लागेल. मुलांना अभ्यास बोअर वाटेल.
कर्क – ( शुभ रंग- हिरवा )
वाणीत गोडवा ठेवलात तर अनेक किचकट कामे सोपी होतील. आज पैशाची कमतरता भासणार नाही. एखाद्या क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्यांशी थोडे बिनसणार आहे.
सिंह – ( शुभ रंग- मरून )
नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठांना गुड मॉर्निंग करणे हिताचे राहील. आज अहंकारास लगाम गरजेचा असेल. अति स्पष्टवक्तेपणा ने काही नाती दुरावतील.
कन्या – ( शुभ रंग – डाळिंबी )
आज शब्द हे शस्त्र आहे याचे भान ठेवून वागलेले बरे, अती आक्रमकता नुकसानास कारणीभूत होईल. दूरचे प्रवास करणार असाल तर सतर्क राहा. मौल्यवान वस्तू जपा.
तुळ – ( शुभ रंग – चंदेरी )
दैवाची उत्तम साथ असल्याने कार्यक्षेत्रात प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. ध्येय प्राप्ती कडे वेगाने वाटचाल कराल. आज दुपारनंतर एखादा धनलाभ संभवतो.
वृश्चिक – ( शुभ रंग- आकाशी)
आज अत्यंत उत्साही दिवस असून तुमचा कामातील उरक चांगला राहील. नोकरीत तुमच्यावर वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. हाताखालच्या माणसांवर तुमचा वचक राहील.
धनु – ( शुभ रंग- जांभळा)
आज दैव तुमच्याच बाजूने आहे. कार्यक्षेत्रात श्रम कारणी लागतील घरात थोरांचे मूड मात्र सांभाळावे लागतील. भाविकांना देव दर्शनाची ओढ लागेल.
मकर – (शुभ रंग गुलाबी)
आज तुम्हाला उगीचच इतरांच्या भानगडीत डोकावण्याचा मोह होईल, पण तसे न करता फक्त आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केलेले बरे. आज धाडसाची कामे टाळलेली बरी.
कुंभ – ( शुभ रंग – मोरपिशी)
आज कोणत्याही स्पर्धेत अंतिम विजय तुमचाच राहील. वैवाहिक जीवनात काही जुन्या स्मृती मनास आनंद देतील. प्रेम प्रकरणांना घरच्यांकडून ग्रीन सिग्नल मिळू शकतो.
मीन – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
कार्यक्षेत्रात आत्मविश्वासाने विपरीत परिस्थितीशी झुंज द्याल. इतरांवर विसंबून न राहता स्वावलंबनाचे धोरण हिताचे राहील. येणी वसूल झाल्याने नवीन व्यावसायिकांचा उत्साह वाढेल.