Pimpri News : उद्योजकांच्या विविध समस्यांचे आमदार बनसोडे व महावितरण कार्यकारी अभियंता यांना निवेदन 

एमपीसी न्यूज – उद्योजकांना येणाऱ्या विविध समस्यांचे आमदार अण्णा बनसोडे व पिंपरी महावितरण कार्यालयाचे महावितरण कार्यकारी अभियंता यांना सोमवारी (दि.12) निवेदन देण्यात आले. पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, सचिव जयंत कड, संचालक प्रमोद राणे, विनोद मित्तल यांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले. 

पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील महावितरणच्या नवीन सुविधा उपलब्ध करण्यासाठी रास्ता पेठ येथील महावितरण कार्यालयाच्या मुख्य अभियंता यांच्यासोबत बैठक होणे गरजेचे असल्याचे यावेळी संदीप बेलसरे यांनी नमूद केले.

जुन्या झालेल्या सुविधा, ट्रान्सफॉर्मरवर वाढलेला अतिरिक्त लोड त्यामुळे वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा यामुळे उद्योजकाचे होणारे नुकसान यावर सविस्तर चर्चा होणे गरजेचे आहे. अतिरिक्त झालेला लोड नवीन ट्रान्सफॉर्मर बसून विभागण्यात यावा. DPR मंजुरीसाठी हेड ऑफिसला पाठपुरावा करण्याकरिता प्रयत्न करावा. कारण DPR मधून नवीन पायाभूत सुविधा, नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे शक्य होईल, उद्योजकाचे होणारे नुकसान टाळण्यास मदत होईल असे या निवेदनात म्हटले आहे.

निवेदनात नमूद केलेल्या विविध समस्या

– फिडरला अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणे

– फिडर पिलर मधील HRC, FUSE WIR व आतील खराब झालेले पार्टस बदलणे व खराब झालेले दरवाजे बदलणे.

– नादुरुस्त केबल वेळेवर उपलब्ध करून देणे

 – फिडरची लांबी कमी करणे.

– ओव्हर लोडेड ट्रान्सफॉर्मर वरचा लोड कमी करणे व त्यातील ऑईलची पातळी आवश्यक तेवढीच ठेवणे व आवश्यक त्या ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे.

– महावितरणच्या पिंपरी-चिंचवड औद्योगिक विभागासाठी DPR साठी हेड ऑफिसला पाठपुरावा करणे

– महावितरणच्या पिंपरी व चिंचवड विभागातील खंडित वीज पुरवठ्याच्या तक्रारी प्रंचंड प्रमाणात वाढलेल्या आहेत. या विभागातून सदर तक्रारीकडे दोन दोन दिवस कोणीही लक्ष देत नाही. त्यावर उपाययोजना करणे व कायमस्वरूपी कार्यक्षम अधिकारी नेमणे.

यासारख्या विविध समस्यांचा निवेदनात समावेश करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.