Today’s Horoscope 14 May 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 14 May 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – रविवार

14.05.2023.

शुभाशुभ विचार – वैधृती योग.

आज विशेष- वर्ज्य दिवस.

राहू काळ – सायंकाळी04.30 ते 06.00.

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आजचे नक्षत्र- शततारका 10.16 पर्यंत नंतर पूर्वा भाद्रपदा

चंद्र राशी – कुंभ.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- आकाशी )

आज दिवस लाभाचा असताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. दिवसाच्या उत्तरार्धात एखादा लाभ संभवतो. जुन्या मित्रमंडळींच्या सहवासात आजची संध्याकाळ मजेत जाईल.

वृषभ (शुभ रंग- केशरी )

नोकरदारांना आज वरिष्ठ गोड बोलून राबवून घेतील. खोटी स्तुती करणारे मित्र भेटतील. नोकरीत साहेब जितके विचारतील तितकेच बोला. लवकर घर गाठा.

मिथुन ( शुभ रंग- पांढरा )

दूरच्या प्रवासात झालेल्या काही नव्या ओळखी पुढील काळात व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने फायदेशीर ठरतील. ज्येष्ठ मंडळी आज तीर्थयात्रेचे बेत आखतील.

कर्क (शुभ रंग- डाळिंबी)

महत्त्वाच्या कामात थोडेफार अडथळे येतील. आज आपल्या आवाक्या बाहेरच्या जबाबदाऱ्या स्वीकारूच नका. मोठ्या रकमेची ने आण करताना सावध राहा.

सिंह ( शुभ रंग – गुलाबी)

उद्योगधंद्याच्या ठिकाणी अनुकूल वातावरण असेल. आज समोर येणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्या प्रभावात असेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या मताने घ्याल.

कन्या ( शुभ रंग- निळा)

नोकरदारांना अधिकारी वर्गाकडून सन्मानाची वागणूक मिळेल. कार्यक्षेत्रात तुम्ही केलेल्या कष्टांचे फळ मिळेल. कामाच्या व्यापात तब्येतीच्या तक्रारी दुर्लक्षित करू नका.

तूळ ( शुभ रंग- पिस्ता)

उच्चशिक्षितांच्या महत्त्वकांक्षा व अपेक्षा वाढतील. आज तुमचा उच्च राहणीमानाकडे कल राहील नवविवाहित मंडळींना बाळाच्या आगमनाची चाहूल लागेल.

वृश्चिक (शुभ रंग- राखाडी)

बरेच दिवसापासून दुर्लक्षित झालेल्या घरगुती कामांकडे आज लक्ष द्यावेसे वाटेल. मुलांचे लाड आवरते घेऊन त्यांच्या शिस्तीकडेही लक्ष द्यावे लागणार आहे.

धनु- (शुभ रंग- भगवा)

आज तुमचा रिकामटेकड्या गप्पा मारण्यात बराच वेळ फुकट जाण्याची शक्यता आहे. तुमची काही गुपिते आज उघड होतील. कमी बोलून आज फक्त कृतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे.

मकर ( शुभ रंग- डाळिंबी )

आज कुटुंबीयांच्या वाढत्या गरजा भागवण्यासाठी पैशाची कमतरता भासणार नाही. गृहिणी अनपेक्षित पण येणाऱ्या पाहुण्यांची उठवस आनंदाने करतील.

कुंभ (शुभ रंग – क्रीम)

आज तुम्ही एखादी गोष्ट फारच मनाला लावून घ्याल बरेच दिवसापासून गहाळ झालेली एखादी वस्तू आज अचानक सापडेल. आपल्या आवडत्या छंदास आज वेळ देता येईल.

मीन -(शुभ रंग – पांढरा )

दिवस खर्चाचा असताना बिनधास्त खर्च करा. आज कंजूषणाचा काहीही उपयोग नाही. तातडीने दूरच्या प्रवासास निघत असाल तर प्रवासात आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क-9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.