Today’s Horoscope 15 December 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 15 December 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – शुक्रवार.

तारीख – 15.12.2023.

शुभाशुभ विचार- उत्तम दिवस. 

आज विशेष – सामान्य दिवस.

राहू काळ – दुपारी 10.30  ते 12.00.

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आज नक्षत्र – पूर्वशाढा 08.11  पर्यंत नंतर उत्तरा शाढा.

चंद्र राशी – धनु 13.45 पर्यंत नंतर मकर.

—————————–

मेष  ( शुभ रंग – राखाडी)

उद्योग धंद्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस असून आज सर्व कामे सुरळीत पार पडतील. आज तुम्ही फक्त कर्तव्याला प्राधान्य द्याल. आपल्या कार्यक्षेत्रात यशस्वी नेतृत्व कराल.

वृषभ ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आज अति आक्रमकता नुकसानास कारणीभूत होईल. कायद्याची चौकट मोडणे महागात पडू शकते. महत्त्वाच्या घरगुती प्रश्नात आज वडीलधाऱ्यांचे मत अवश्य घ्या.

मिथुन ( शुभ रंग- हिरवा)

विश्वासू माणसाकडूनही विश्वासघात होईल. आज मित्रही दगा देतील. कार्यक्षेत्रातही सावधगिरीने पावले टाकणे आवश्यक आहे. वाहन चालवताना काळजी घ्या.

कर्क  ( शुभ रंग – पिस्ता)

आज तुमच्यात ऐश आरामी वृत्ती बळावेल. स्मार्टवर्क करण्यास तुम्ही प्राधान्य द्याल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय तेजीत चालतील. कलावंत मिळालेल्या संधीचे सोने करतील.

सिंह ( शुभ रंग – क्रीम)

स्थावर मालमत्ते संबंधित काही रखडलेले व्यवहार असतील तर ते आज मार्गी लागतील. मुलांची अभ्यासात एकाग्रता वाढेल. आज प्रेम प्रकरणात फसवणूक संभवते.

कन्या  ( शुभ रंग- भगवा)

काम कमी आणि दगदग जास्त होईल. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होईल. रिकामटेकडी चर्चा वादाला कारणीभूत होईल. शेजाऱ्यांशी संबंध सुधारतील.

तूळ ( शुभ रंग- डाळिंबी)

धंद्यातील येणी वसूल होतील. गोड बोलून आपला स्वार्थ साधून घेण्याची कला आज तुम्हाला चांगलीच जमेल. कार्यक्षेत्रात आज स्वतःचे महत्त्व सिद्ध करता येईल.

वृश्चिक ( शुभ रंग – निळा)

आज तुमचे मन काहीसे चंचल राहील. अति उत्साहात काही चुकीचे निर्णय घ्याल. आज प्रवासात काही नवे हितसंबंध जुळून येतील. शेजाऱ्यांशी सलोखा वाढेल.

धनु  (शुभ रंग- जांभळा)

आवक पुरेशी असली तरीही आज बचतीस प्राधान्य देणे हिताचे राहील. क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्यांशी मतभेदाची शक्यता आहे. गोड बोलून स्वार्थ साधावा लागेल.

मकर ( शुभ रंग – मोरपंखी)

आज तुमची तब्येत जरा नरमच असेल. किरकोळ गोष्ट फार मनाला लावून घ्याल. आज जशास तसे या धोरणाने वागा. मोफत सल्लागार मंडळींना जरा लांबच ठेवा.

कुंभ  (शुभ रंग- पांढरा)

पर्यटनाचे व्यवसाय चांगले चालतील. घरात आज थोर मंडळींशी काही वैचारिक मतभेद होतील. अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. थोडी भटकंती होईल.

मीन  ( शुभ रंग- आकाशी)

आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून बऱ्याच दिवसापासून च्या काही इच्छा पूर्ण होतील. वाहन, वास्तू खरेदीतील अडथळे दूर होतील आज तुम्ही म्हणाल ती पूर्व करून दाखवाल.

श्री जयंत कुळकर्णी.

ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.

फोन – 9689165424.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.