Nigdi : भक्ती शक्ती शिल्प समुहालगत असलेल्या भुखंडाबाबत निगडी येथे आंदोलन

एमपीसी न्यूज – भक्ती शक्ती शिल्पसमूहालगत (Nigdi)असलेल्या जागेबाबत पीएमआरडीए प्रशासन शासनाची दिशाभूल करत असल्याचा आरोप करत शहरातील विविध संस्थांच्या वतीने गुरुवारी (दि. 14) निगडी येथे आंदोलन करण्यात आले.

यावेळी मारुती भापकर, सचिन चिखले, अण्णा कसबे, रोहिदास शिवणेकर, डी पी खंडागळे, चंद्रकांत लोंढे, युवराज दाखले, सागर तापकीर, जीवन बोराडे, ज्ञानेश्वर मलशेट्टी, आशा शहाणे, शिवाजी साळवे, बालाजी कांबळे, बाळासाहेब गालफाडे, आबासाहेब मांढरे, ब्रह्मानंद जाधव, सुरेश भिसे, प्रकाश जाधव, सतीश काळे, वैभव जाधव, बालाजी साळवे, बालाजी गवारे, सचिन बोराडे, दिनेश दोराडे, महानंदा कसबे, अक्षय उदमीटे आदी उपस्थित होते.

Pune : अजित पवार यांनी सांगितले तर पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढविण्याची तयारी – दीपक मानकर

भक्ती शक्ती शिल्प समूहालगत(Nigdi) असलेली जागा कायमस्वरूपी छत्रपती शिवाजी महाराज जयंती, साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे जयंती, जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, समस्त ग्रामस्थ निगडी जत्रा उत्सव, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी हे राष्ट्रीय सण साजरे करण्याकरता कायमस्वरूपी राखीव रहवी, या जागेत भव्य शिवसृष्टी व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारावा या मागणीसाठी गेल्या वर्षभर समिती व सर्व राजकीय सामाजिक संस्थांच्या वतीने वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने सुरू आहेत.

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री खासदार आमदार यांना समितीच्या वतीने मागणी करण्यात आली आहे. मात्र पीएमआरडीए प्रशासन शासनाची दिशाभूल करून अत्यंत षडयंत्र पूर्वक हा भूखंड बिल्डरांच्या घशात घालू पाहत असल्याचे उपस्थितांनी सांगितले. याबाबत गुरुवारी या जागेवर जाऊन समितीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.