Pune : पंतप्रधान मोदींनी केले पुणेकरांचे कौतुक; ‘पालक – बालक’ उपक्रमाचा अनोखा गिनीज रेकॉर्ड

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय पुस्तक न्यास, दिल्ली (नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया) यांच्या वतीने (Pune) पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर 16 ते 24 डिसेंबर दरम्यान ‘पुणे पुस्तक महोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. यापूर्वी आज पुण्यात “शांतता… पुणेकर वाचत आहेत” आणि “पालक-बालक गोष्टी सांगायचा गिनीज रेकॉर्ड” असे दोन उपक्रम पुणेकरांच्या लोकसहभागातून झाले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या उपक्रमाची आपल्या एक्स (ट्विटर) हॅण्डलवरून दखल घेतली आणि वाचनसंस्कृतीचे संवर्धन केल्याबद्दल सर्व पुणेकरांचे कौतुक केले.

याबद्दल ‘पुणे पुस्तक महोत्सवाचे’ संयोजक राजेश पांडे यांनी पंतप्रधान मोदी यांचे पुणेकरांच्या वतीने विशेष आभार मानले. पुण्यात महापालिकेच्या पुढाकाराने पार पडलेल्या या उपक्रमात तीन हजार सहासष्ट पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टींचे वाचन करून दाखवले. यामध्ये विशेषत: ‘मन की बात’ मधील गोष्ट वाचून दाखवल्या गेल्या. या उपक्रमाबाबत नॅशनल बुक ट्रस्टने आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवर बालक – पालक : पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगायच्या उपक्रमाची माहिती दिली तसेच छायाचित्रे प्रसिद्ध केली.

Pune : अजित पवार यांनी सांगितले तर पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढविण्याची तयारी – दीपक मानकर

या पोस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर करीत, वाचनाचा आनंद पोहोचवण्यासाठी उत्तम प्रयत्न केले आहेत. या प्रयत्नांमध्ये सहभागी झालेल्या सर्वाचे मनःपूर्वक अभिनंदन, अशा शुभेच्छा दिल्या. या उपक्रमात विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालक, वकील, उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक अशा विविध क्षेत्रातील नागरिकांनी सहभाग नोंदवला.

याशिवाय “शांतता..पुणेकर वाचत आहे” हा उपक्रमही आज पुणेकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने पार पडला. यामध्ये सुमारे दोन लाख पुणेकरांनी थेट सहभाग नोंदवला. तसेच 7000 पेक्षा जास्ती संस्थांनी सहभाग नोंदवला. अशी माहिती पांडे यांनी दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत एका गुगल फॉर्मवर नागरिकांनी आपला प्रतिसाद नोंदवला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मिलिंद वेर्लेकर, डॉ. संजय चाकणे, प्रसेनजित फडणवीस, राहुल पाखरे आदींनी जबाबदारी पार पाडली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन कि बात’ कार्यक्रमातून वाचनाची प्रेरणा घेऊन आजच्या गिनीज रेकॉर्डची (Pune) संकल्पना आकाराला आली होती. या संपूर्ण उपक्रमाची दाखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली. ही समस्त पुणेकरांसाठी अभिमानाची बाब आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आम्ही आभारी आहोत, असे पुणे महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे आणि राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे संचालक युवराज मलिक यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.