Today’s Horoscope 15 Nov 2023 : जाणून घ्या आजचे राशीभविष्य

एमपीसी न्यूज – आजचे पंचांग. आजचा दिवस – बुधवार.

तारीख – 15 नोव्हेंबर 2023. शुभाशुभ विचार – आनंदी दिवस. (Today’s Horoscope 15 Nov 2023)

आज विशेष – भाऊबीज, यमद्वितीया.

राहू काळ – दुपारी १२.०० ते ०१.३०.

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आज नक्षत्र – ज्येष्ठा.

चंद्र राशी – वृश्चिक.

—————————–

Today’s Horoscope 15 Nov 2023

मेष – (शुभ रंग – क्रीम)

आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकला. आज ज्येष्ठांची पावले सत्संगाकडे आपोआप वळतील.

वृषभ – (शुभ रंग- राखाडी)

सगळी महत्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धात उरकून घ्या. संध्याकाळी आर्थिक व्यवहार जपून करा. भागीदारीच्या व्यवहारात काही सौम्य स्वरूपाचे मतभेद संभवतात.

मिथुन – (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

नोकरदारांवर वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. आज तब्येत थोडी नरमच राहील. जुनी दुखणे अंगावर काढू नका पती-पत्नी मधील काही मतभेद सुसंवादाने मिटतील.

कर्क – (शुभ रंग – पांढरा)

तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज दैवाची उत्तम साथ लाभेल. स्वतःचे छंद जपण्यासाठी वेळही काढता येईल. तुमच्या कामातील उत्साहाचा विरोधकांनाही हेवा वाटेल.

Today’s Horoscope 15 Nov 2023

Kartik : ओळख मराठी महिन्यांची भाग 8 – दीपोत्सवाचा महिना कार्तिक!

सिंह – (शुभ रंग – हिरवा )

व्यापार उद्योगास पूर्ववत गती येईल. कार्यक्षेत्रात आपली मते इतरांना पटवून द्याल. आज स्थावराचे व्यवहार लाभ देतील. आज मातोश्रींचे सल्ले ही महत्त्वपूर्ण असतील.

कन्या – (शुभ रंग- जांभळा)

आज जुन्या ओळखीतून काही व्यवसाय वृद्धीच्या संधी येतील. केवळ चर्चेपेक्षा आज झटपट निर्णय घेणे योग्य ठरेल. गृहिणींना आज थोडा थकवा जाणवेल.

तूळ – (शुभ रंग- सोनेरी)

धंद्यातील येणी अनपेक्षित पणे वसूल होतील. मृदू वाणीने आज तुम्ही तुमच्या विरोधकांनाही आपलेसे कराल. आवक पुरेशी असली तरीही अनावश्यक खर्च थांबवायला हवेत.

वृश्चिक – (शुभ रंग – निळा)

महत्त्वाच्या चर्चेत इतरांचेही म्हणणे ऐकून घ्या. समोरची व्यक्ती आपल्यापेक्षाही हुशार असू शकते याचे भान ठेवा. तुमच्या लहरी व संशयी स्वभावावर नियंत्रण ठेवायला हवे.

Today’s Horoscope 15 Nov 2023

धनु – (शुभ रंग- चंदेरी)

हाती असलेल्या पैशाची उधळपट्टी करायला नको. कदाचित संध्याकाळी एखादा मोठा खर्च उद्भवेल की जो टाळता येणार नाही. एखादी चीज वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे. सतर्क रहा.

मकर – (शुभ रंग- मोरपिशी)

आज कार्यक्षेत्रात काही मनाजोगत्या घटना तुमच्या उत्साह वाढवतील. गोडबोल्या मंडळींपासून मात्र दूरच रहा. आज विरोधकही मैत्रीचा हात पुढे करतील.

कुंभ – (शुभ रंग- आकाशी)

उद्योगधंद्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस असून नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य राहील. अधिकार योग चालून येतील. हाताखालचे लोक तुमच्याशी आदबीने वागतील. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व.

मीन ( शुभ रंग- आकाशी)

नोकरी धंद्यात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येऊ शकते. आज हातचे सोडून पळत्या मागे धावायचा मोह होईल पण तसे करू नका. झटपट लाभाचा मोह टाळा संयम गरजेचा आहे.

जयंत कुळकर्णी

ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार

फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.