Alandi : दिवाळी पाडव्यानिमित्त माऊलींच्या मंदिरात पुष्पसजावट आणि विद्युत रोषणाई!

एमपीसी न्यूज – दिवाळी पाडव्यानिमित्त संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दर्शनासाठी माऊली मंदिरात (Alandi) पहाटे पासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पाडव्यानिमित्त मंदिराच्या गाभाऱ्यात तसेच महाद्वार येथे पुष्पसजावट करण्यात आली होती. मंदिरा भवताली विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पहाटे मंदिरात लावलेल्या पणत्यांच्या प्रकाशाने तेथील परिसर उजळून निघाला होता.

आळंदी (Alandi) शहरात दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.दिवाळी निमित्त बाल गोपालांनी ठिकठिकाणी आकर्षक असे किल्ले बनवले आहेत. मोठ्या उत्साहात नागरिक फटाक्यांची आतषबाजी करत आहेत.

Kartik : ओळख मराठी महिन्यांची भाग 8 – दीपोत्सवाचा महिना कार्तिक!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.