Subrata Roy Passes Away : सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांचे निधन

एमपीसी न्यूज – सहारा इंडिया समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांचे मंगळवारी निधन झाले. (Subrata Roy Passes Away) वयाच्या 75 व्या वर्षी मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

सहारा परिवाराचे प्रमुख सुब्रतो रॉय दीर्घकाळापासून गंभीर आजाराने त्रस्त होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रविवारी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (Subrata Roy Passes Away)   बुधवारी त्यांचे पार्थिव लखनऊमधील सहारा शहरात आणले जाणार असून, तिथे त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येतील.

सुब्रतो रॉय यांचा जन्म 10 जून 1948 रोजी झाला. ते भारतातील आघाडीचे व्यापारी आणि सहारा इंडिया उद्योग समूहाचे संस्थापक होते. ते देशभरात ‘सहाराश्री’ म्हणूनही ओळखले जात होते.

गोरखपूरच्या शासकीय तांत्रिक संस्थेतून त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. त्यांनी 1976 मध्ये गोरखपूर येथून व्यवसायाला सुरुवात केली. 1992 मध्ये सहारा समूहाने राष्ट्रीय सहारा नावाचे वृत्तपत्र काढले.

याशिवाय कंपनीने ‘सहारा टीव्ही’ नावाचे स्वतःचे टीव्ही चॅनेल देखील सुरू केले होते. कंपनी मीडिया, रिअल इस्टेट, फायनान्ससह अनेक क्षेत्रात काम करीत आहे.

Alandi : दिवाळी पाडव्यानिमित्त माऊलींच्या मंदिरात पुष्पसजावट आणि विद्युत रोषणाई!

अनेक वर्षांपासून लोकांचे पैसे न दिल्याने सहारा इंडियाविरुद्ध पाटणा उच्च न्यायालयात खटला सुरू आहेत. लोकांनी हे पैसे कंपनीच्या अनेक योजनांमध्ये गुंतवले होते. मात्र नंतर याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून सहाराश्रींना मोठा दिलासा मिळाला.

गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने पाटणा उच्च न्यायालयाच्या अटकेच्या आदेशावर तात्काळ सुनावणी करून स्थगिती दिली होती. तसेच त्यांच्यावर पुढील कारवाईबाबत स्थिती कायम ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

सुब्रतो रॉय (Subrata Roy Passes Away)  यांच्यावरही असाच एक खटला सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. ते सध्या जामिनावर बाहेर होते. गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याबाबत सहारा इंडियाचा दावा आहे की, त्यांनी संपूर्ण रक्कम सेबीकडे जमा केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.