Today’s Horoscope 15 October 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 15 October 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – रविवार.

15.10.2023.

शुभाशुभ विचार- 10 नंतर चांगला दिवस.

आज विशेष-घटस्थापना, नवरात्रारंभ.

राहू काळ – संध्याकाळी 04.30 ते 06.00.

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आजचे नक्षत्र –  चित्रा 18.22 पर्यंत नंतर स्वाती.

चंद्र राशी – तूळ.

————————————

मेष ( शुभ रंग- डाळिंबी )

व्यवसायातील तीव्र स्पर्धेचा सामना तुम्ही यशस्वीपणे कराल. वैवाहिक जीवनातील लज्जत वाढेल. आज पत्नीकडे मन मोकळे करताना मात्र हातचे राखूनच बोला.

वृषभ (शुभ रंग- राखाडी )

नोकरीच्या ठिकाणी आज इतरांच्या भानगडीत न पडता बिनचूक कामास प्राधान्य द्यायला हवे. आज काही मान अपनांच्या प्रसंगांना तोंड द्यावे लागेल. संयम गरजेचा राहील.

मिथुन ( शुभ रंग- आकाशी )

आज तुमचा उत्साह व कार्यक्षमता चांगली असेल. कुटुंबात आर्थिक सुबत्ता नांदेल. प्रेम प्रकरणांना थोरा मोठ्यांकडून ग्रीन सिग्नल मिळेल. चैनी व विलासी वृत्ती बळावेल.

कर्क (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आज संमिश्र फळे देणारा दिवस असून बेरोजगारांना घराजवळ रोजगाराच्या संधी येतील. वास्तू वाहन खरेदीसाठी कर्ज मंजुरी होईल. कलावंतांना प्रयत्न वाढवावे लागतील.

सिंह (शुभ रंग- मोतिया )

एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बरीच धावपळ होईल. स्थावर, शेतीवाडी खरेदी विक्रीच्या कामात अडथळे येतील. आज प्रलोभनांपासून लांबच रहा. वाद टाळा.

कन्या ( शुभ रंग- चंदेरी )

आज कार्यक्षेत्रातील काही अनुकूल घटना तुमच्या आत्मविश्वासात भर घालतील. पैशाअभावी बराच काळ रखडलेले उपक्रम मार्गी लावू शकाल. आज आशादायी दिवस आहे.

तूळ ( शुभ रंग- जांभळा )

आज मनाच्या लहरीपणास आवर घालणं गरजेचे आहे. अति महत्त्वाकांक्षांना ब्रेक लावून तब्येतीची ही काळजी घेणे गरजेचे. मृदू वाणीने बरेच अवघड प्रश्न सोपे होतील.

वृश्चिक (शुभ रंग- मोतिया)

आज तुमची तब्येत थोडी नरमच असली तरीही तुमचा कामातील उत्साह दांडगा असेल. महत्त्वाच्या कामासाठी केलेले प्रवास कार्य साधक ठरतील. अनावश्यक खर्च टाळायला हवा.

धनु- (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

वाढत्या खर्चातही पैशाची आज कमतरता भासणार नाही आज कार्यक्षेत्रात तुमच्या नेतृत्वगुणांना चांगला वाव मिळेल. आज वक्त्यांची भाषणे प्रभावी होतील.

मकर ( शुभ रंग- मोरपंखी)

महत्त्वाची सर्व कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. कोणतेही गैरव्यवहार टाळा. आज नीतीबाह्य वर्तन अंगाशी येऊ शकते. आपल्या प्रतिष्ठेची काळजी घ्या.

कुंभ (शुभ रंग – गुलाबी )

आज दैवाचे पाठबळ उत्तम असल्याने तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यशाची खात्रीच बाळगा. सज्जनांच्या सहवासात तुमचे विचार प्रगल्भ होतील. व्यक्तिमत्व विकास साधाल.

मीन -(शुभ रंग – सोनेरी )

तुमचे हित शत्रू कदाचित तुमच्या मित्रांमध्येच लपलेले असू शकतात. कोणतीही धाडसाची कामे आज नकोत सावध असावे. आज कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. विश्वासू मित्र ही दगा देतील.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क – 9689165424.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.