World Cup 2023 : पाकिस्तान चारीमुंड्या चीत; भारताने पाकिस्तानला 7 गडी राखून चारली धूळ

विश्वचषकातील पाकिस्तानच्या पराभवाची मालिका अबाधित

एमपीसी न्यूज – अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या भारत (World Cup 2023) पाकिस्तान सामन्यात भारताने पाकिस्तानच्या फलंदाजी आणि गोलंदाजीवर आक्रमण करत पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केले. भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला 191 धावांवर रोखत 7 गडी राखून सहज विजय मिळविला. विश्वचषकात सलग 8 वेळा पाकिस्तानला भारताकडून पराभव पत्करावा लागला असून त्यांची विश्वचषकात भारताकडून पराभूत होण्याची मालिका अखंडित राहिली आहे.

नाणेफेक जिंकून भारताने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय चुकीचा ठरतो की काय असे वाटत असताना मोहम्मद सिराजने नवख्या मोहम्मद शफीकला पायचीत केले.

त्यानंतर आलेल्या कर्णधार बाबर आझमने मैदानावर पाय रोवायला सुरुवात केली तेवड्यात पंड्याने इमाम उल हक याला के एल राहुल करवी झेलबाद केले. मोहम्मद रिजवान खेळायला आला त्याला जडेजाने पायचीत पकडले.

पण डीआरएस चा वापर त्याने केला, त्यात तो नॉट आउट ठरला. त्यानंतर बाबर आणि रिझवान यांनी तिसऱ्या गड्यासाठी अर्धशतकिय भागीदारी केली. जसे बाबरने 50 धावा अर्धशतक केले तसे सिराजने त्याचा त्रिफळा उडविला.

त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी कोणत्याही पाकिस्तानी फलंदाजाला मैदानावर तग धरू दिला नाही. त्यांचे 5 खेळाडू एकेरी धावा करून बाद झाले आणि पाकिस्तानचा संघ 42.5 शतकात 191 धावांवर गारद झाला.

2 बाद 152 धावा अशा भक्कम स्थितीत असणाऱ्या पाकिस्तानचे (World Cup 2023) पुढील 8 खेळाडू अवघ्या 39 धावांमध्ये बाद झाले. जसप्रीत बुमराह 2, मोहम्मद सिराज 2, कुलदीप यादव 2, रवींद्र जडेजा 2, आणि हार्दिक पंड्या 2 यांनी पाकिस्तानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.

तथापि, 192 धावांचे लक्ष्य पेलताना भारताची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही. शुभमन गिल केवळ 16 धावा करून एका चांगल्या फटक्यावर बाद झाला.

Pune : खडकवासला धरण परिसरातील सांडपाण्यावर प्रक्रिया न करणाऱ्या हॉटेलवर कारवाई करा-अजित पवार

शाहीन आफ्रिदीने त्याला शादाब खानकडे झेल देण्यास भाग पाडले. विराट कोहली देखील 16 धावा करून बाद झाला. तथापि, रोहित शर्माने धावांची गती कमी होऊ न देता एका बाजूने फटकेबाजी करत 63 चेंडूत 86 धावांची महत्वपूर्ण खेळी केली.

त्याला श्रेयस अय्यरने चांगली साथ दिली. या दोघांनी मिळून अर्धशतकी भागीदारी रचली. श्रेयस अय्यरने विश्वचषकातील आपले पहिले अर्धशतक साजरे केले.

त्याने 53 धावांचे योगदान दिले. के एल राहुल 19 आणि अय्यर या जोडीने 30.3 षटकांमध्ये भारताला विजय मिळवून दिला. पाकिस्तानच्या वतीने शाहीन आफ्रिदीने २ गडीबाद केले तर आणि हसन अली याने 1 बळी मिळवला.

पाकिस्तानची फलंदाजी आणि गोलंदाजी आजच्या सामन्यात पूर्णपणे अपयशी ठरली. या विजयासह भारताने विश्वचषकातील संघांच्या पॉइंटटेबल मध्ये अव्वल स्थानी झेप घेतली आहे. त्याच्या खात्यात 6 गुण जमा झाले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.