Today’s Horoscope 17 September 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 17 September 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – रविवार.

17.09.2023.

शुभाशुभ विचार-उत्तम दिवस.

आज विशेष- साधारण दिवस.

राहू काळ – सकाळी 04.30 ते 6.00.

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आजचे नक्षत्र – हस्त 10.02 पर्यंत नंतर चित्रा

चंद्र राशी – कन्या 23.08 पर्यंत नंतर तूळ.

————————————

मेष – ( शुभ रंग- मरून )

नोकरीच्या ठिकाणी विरोधकांच्या काही उचापती चालूच राहतील. आरोग्य विषयक तक्रारींची वेळीच दखल घेणे आवश्यक आहे. दुकानदारांची थकलेली येणी आज वसूल होऊ शकतात.

वृषभ (शुभ रंग- गुलाबी )

नोकरदारांना नोकरीत बदल करण्यासाठी योग्य संधी चालून येतील. नवोदित कलाकारांच्या अथक प्रयत्नांना यश येईल. रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळेल.

मिथुन ( शुभ रंग- मोरपंखी )

जमीन खरेदी विक्रीचे काही व्यवहार मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना किचकट विषयातही गोडी निर्माण होईल. गृहिणींना आज अजिबात उसंत मिळणार नाही.

कर्क (शुभ रंग- आकाशी)

आजचा दिवस धावपळीचा आहे. तुमचा आत्मविश्वास बुद्धींगत करणारी एखादी घटना घडेल. उच्च अधिकारी असाल तर सह्या करण्यापूर्वी मजकूर नीट वाचून घ्या.

सिंह (शुभ रंग- पांढरा )

आज तुमची मिळकत उत्तम असेल. गृहिणींना अचानक येणाऱ्या पाहुण्यांची उठबस करावी लागेल आज प्रवास त्रासदायक होऊ शकतात फारच अर्जंट नसतील तर टाळलेले बरे.

कन्या ( शुभ रंग- हिरवा )

महत्त्वाचे निर्णय विचारांती घ्या. अडचणीच्या प्रसंगी आज जोडीदाराने दिलेले सल्ले महत्त्वाचे असतील. कमी श्रमात जास्त लाभाच्या अपेक्षेने निराशाच पदरात पडू शकते.

तूळ ( शुभ रंग- लाल )

आज मी पण प्रगतीच्या येऊ शकतो. मृदू वाणीने बरीच अवघड कामे सोपी करता येतील. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी तातडीचा प्रवास घडण्याची शक्यता आहे.

वृश्चिक (शुभ रंग- चंदेरी)

आज केलेल्या कोणत्याही वाटाघाटी सकारात्मकतेने पार पडतील जिवलग मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल शेअर्सच्या व्यवहारातील तुमचे अंदाज खरे ठरतील.

धनु- (शुभ रंग- मोतिया)

नोकरीच्या ठिकाणी उच्च अधिकारी वर्गाशी सलोखा वाढेल. कामाच्या व्यापात आज कुटुंबीयांसाठी वेळ देणे अवघड होईल. संध्याकाळी मित्रांचा सहवास लाभेल.

मकर ( शुभ रंग- जांभळा )

घरात वडीलधाऱ्या मंडळींशी वैचारिक मतभेद होतील. परंतु त्यांच्या शब्दाचा मान राखाल. आज काही खोटी आश्वासने देणारे मित्र भेटतील  त्यांना दुरूनच रामराम करा.

कुंभ (शुभ रंग – पिस्ता )

नवीन व्यावसायिकांनी स्पर्धकांना कमजोर समजू नये. नोकरदारांनी नोकरीच्या ठिकाणी आज नियमांचे पालन काटेकोरपणे करावे. हीतशत्रू तपूनच बसलेले आहेत. सतर्क रहा.

मीन -(शुभ रंग – क्रीम)

व्यवसायात भागीदारांशी सलोख्याचे संबंध असतील. वैवाहिक जीवनातही आज गोडी गुलाबी असेल. काही जुन्या आठवणी मनाला आनंद देतील. आज आशादायी दिवस.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क – 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.