Today’s Horoscope 19 July 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 19  July 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – बुधवार

19.07.2023.

शुभाशुभ विचार- उत्तम दिवस

आज विशेष- सामान्य दिवस.

राहू काळ – दुपारी 12.00 ते 01.30. 

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आजचे नक्षत्र – पुष्य 07.58  पर्यंत नंतर आश्लेषा.

चंद्र राशी – कर्क.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- डाळिंबी )

तुमच्या सामाजिक प्रतिश्ठेत वाढ होईल आज घरात सजनांची उठबस राहील. गृहिणी स्वतःचे छंद जपतील. जमाखर्चाचा तराजू समतोल राहीलच. मुले अज्ञाधारकपणे वागतील. आज गृहसौख्याचा दिवस.

वृषभ (शुभ रंग- मोतिया )

एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी आज वणवण भटकावे लागण्याची शक्यता आहे. गृहिणी शेजार धर्म पाळतील.  जवळपासच्या प्रवासात भविष्याच्या दृष्टीने काही फायदेशीर ओळखी होतील.

मिथुन ( शुभ रंग- डाळिंबी )

धनस्थानातील चंद्र भ्रमण तुमची आर्थिक आवक वाढवेल. आज सभा संमेलनात तुमच्या वक्तृत्वाचा प्रभाव पडेल. गृहिणी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करतील. छान दिवस आहे

कर्क (शुभ रंग- पांढरा)

आज खिशात पैसा खेळता असल्याने तुमची मनस्थिती उत्तम असेल. इतरांना दिलेले शब्द आवर्जून पाळाल. तुमच्यातील सकारात्मकता इतरांस प्रभावित करेल. आजची सगळी कामे सुरळीत पार पडतील.

सिंह (शुभ रंग- गुलाबी )

आज काहीसे लहरीपणाने वागाल. घाई गर्दीत घेतलेले निर्णय चुकतील. तरुणांना आज प्रलोभाने आकर्षित करतील. आज तुम्ही थोडा संयम बाळगण्याची गरज आहे.

कन्या ( शुभ रंग- हिरवा)

आज हार्डवर्क पेक्षा स्मार्ट वर्क करण्याकडेच तुमचा कल राहील. मित्रांनी केलेल्या खोट्या स्तुतीने ही तुम्ही भारावून जाल. मोठेपणा घेण्यासाठी न परवडणारा खर्चही मनापासून कराल.

तूळ ( शुभ रंग- निळा)

आपले कर्तव्य सोडल्यास इतर गोष्टी आज तुमच्यासाठी कमी महत्त्वाच्या असतील. नोकरदारांना प्रमोशनची चाहूल लागेल. आज आपल्या व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल.

वृश्चिक (शुभ रंग- मोरपंखी)

आज तुमच्या प्रयत्नांना दैवाची साथ शंभर टक्के असेल नोकरीत असाल तर साहेबांची कृपादृष्टी राहील. नास्तिक मंडळी ही आज गरजेपुरती आध्यात्मिक होणार आहेत.

धनु- (शुभ रंग- चंदेरी)

जे चाललंय ते बर चाललय म्हणा. कमी श्रमात जास्त लाभाचा मोह धरून चालणार नाही. धाडसाची कामे आज टाळलेलीच बरी आज सासुरवाडीकडून एखादा लाभ होऊ शकतो.

मकर ( शुभ रंग- जांभळा )

वैवाहिक जीवनात सामंजस्य राहील. जोडीदारास दिलेले शब्द पाळाल. व्यवसायात भागीदारांशी एकमत राहील. आज उगीच इतरांच्या भानगडीत पडू नका.

कुंभ (शुभ रंग – राखाडी)

नोकरीच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. पूर्वीचे कष्ट कारणी लागतील. बाढतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. प्रयत्नांना आज नशिबाची साथ नक्कीच मिळेल

मीन -(शुभ रंग – सोनेरी )

आज तुम्ही मुलांचे वाढते हट्ट हौशीने पुरावाल. आपल्या कुटुंबीयांना अभिमानास्पद वाटणारी अशी एखादी कामगिरी कराल. आज जरा मुलांच्या शिस्तीकडेही लक्ष द्या.

शुभम भवतु 

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क – 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.