Kelgaon : केळगावमध्ये सुसज्ज कबड्डी मॅट व बॅडमिंटन हॉलचे उद्घाटन

एमपीसी न्यूज –   केळगाव (Kelgaon) येथील जोग स्पोर्ट्स ॲकडमीत दि.18 रोजी आज सुसज्ज अशा कबड्डी मॅट व बॅडमिंटन हॉलचे उद्घाटन आळंदी पत्रकार संघ व उपस्थित मान्यवरांच्या  हस्ते करण्यात आले.

Moshi : भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला मारले जोडे

यावेळी जोग स्पोर्ट्स ॲकडमीचे प्रमुख व आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच दिनेश गुंड यांनी मैदानी खेळाबाबतचे महत्त्व याबद्दल माहिती दिली. तसेच प्रथम त्यांनी स्थापन केलेली जोग महाराज व्यायाम शाळा ते  आता असलेल्या ( क्रिकेट,स्विमिंग इ.) स्पोर्ट्स अकॅडमी बाबत माहिती दिली. त्या  स्पोर्ट्स ॲकडमी मधील विशेष कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची माहिती दिली.

 

विलास काटे यांनी व्यायाम शाळा ते स्पोर्ट्स अकॅडमी पर्यंतचा दिनेश गुंड यांचा प्रवास मनोगतात सांगितला. यावेळी रामभाऊ गुंड, विजय गुंड, भानुदास पऱ्हाड, विठ्ठल शिंदे, विठ्ठल गुंड, दिनेश कुऱ्हाडे, आदर्श गुंड, हार्दिक गुंड,  प्रशिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.