Moshi : भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला मारले जोडे

एमपीसी न्यूज – भाजपाचे नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ काल समोर आल्यानंतर त्यावरून राजकीय वातावरण तापले असून ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पिंपरी-चिंचवड मधील महिला पदाधिकाऱ्यांनी सोमय्या यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

Pimpri : वैद्यकीय निष्काळजीपणाचा ठपका ठेवत दोन डॉक्टरांसह पाच जणांना दोन वर्षांचा कारावास

शहरातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मोशी ( Moshi) -प्राधिकरण येथील स्पाईन सिटी चौकात सोमय्या यांच्या प्रतिमेला मंगळवारी जोडे मारो आंदोलन केले.

महिला आघाडी जिल्हा संघटक सुलभा उबाळे, पुणे जिल्हा प्रमुख गौतम चाबुकस्वार, धनंजय आल्हाट, निलेश मुटके, शहर संघटिका अनिता तुतारे,  मंगल भोकरे, रजनी वाघ, वैशाली काटकर, तस्लिम शेख, ज्योती भालके, वंदना वाल्हेकर, वंदना खंडागळे, कलावती नाटेकर, आरती कांबळे, लक्ष्मी काची, संतोष पवार, संदीप भालके, नितीन दर्शले, अमित दर्शले, गणेश आहेर, अंकुश पवार, संतोष म्हात्रे,  दस्तगीर मणियार आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सोमय्या यांचा अश्‍लील व्हिडीओ व्हायरल झाला असून   सोमय्या चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.