Talegaon : बियाणे खते आवश्यक वस्तू कायद्याखाली आल्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक टळणार – गणेश भेगडे

एमपीसी न्यूज – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Talegaon) यांनी विधिमंडळात पहिल्याच दिवशी जाहीर केलेल्या खते, बियाणे ही लवकरच आवश्यक वस्तू कायद्यात आणणार असल्याचे जाहीर केले. राज्य सरकारच्या या निर्णयाचे भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने स्वागत करण्यात आले. याबाबत किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी माहिती दिली.

भेगडे म्हणाले, शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी सरकार समर्थन मूल्य, हमीभाव इत्यादी देत असते. कोणत्याही वस्तूचे उत्पादन, पुरवठा, वितरण, साठवणूक, किंमत आणि व्यापाऱ्यांना प्रतिबंध करणे किंवा प्रतिबंध करण्याचा अधिकार सरकारला देणे हा आवश्यक वस्तू कायद्याचा उद्देश असतो.

केंद्राच्या धर्तीवर राज्य शासनाच्या किसान सन्मान निधी योजनेनंतर जाहीर केलेला हा निर्णय म्हणजे हे सरकार शेतकरी हिताचे सरकार असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना भेसळयुक्त बियाणे तसेच चढ्यादराने कमी दर्जाची खते विकून स्वतःची पोळी भाजणाऱ्या घटकांवर अंकुश येईल असा विश्वास भेगडे यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या कोणत्याही घटकाविरुद्ध घेतलेल्या निर्णयावर भाजपा किसान मोर्चा सरकारचे समर्थन करील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नियुक्त केलेल्या शेतीविषयक उच्च अधिकार समितीचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी काम केले आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे वर्षानुवर्ष शेतकऱ्यांची चालणारी लूट थांबणार आहे.

Pimpri : वैद्यकीय निष्काळजीपणाचा ठपका ठेवत दोन डॉक्टरांसह पाच जणांना दोन वर्षांचा कारावास

यामुळे गैरव्यवहार करणाऱ्या घटकांना हा अजामीनपात्र गुन्हा असल्यामुळे कायद्याचा धाक मोठ्या प्रमाणात राहील. खतांमध्ये फिलरच्या नावाने नत्र, स्फुरद, पलाश याचे प्रमाण कमी करून (Talegaon) माती मिश्रित खत चढ्या भावाने विकणाऱ्यांवर यामुळे अंकुश येईल. या निर्णयामुळे खतांची साठेबाजी होणार नाही. तसेच बियाणे सुद्धा शुद्धतेचे, प्रमाणित झालेले आणि आवश्यक सरकारी दाखले घेऊनच विक्री होतील. यामुळे शेतकऱ्याची फसवणूक झाल्यास तो दाद मागू शकेल.

त्यामुळे बोगस बियाणे आणि खतांमुळे नापिकी, कर्जबाजारी पणा इत्यादी कारणामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान यामुळे प्रसंगी होणाऱ्या आत्महत्या यावर अंकुश येईल,असेही भेगडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.