Pimpri : वैद्यकीय निष्काळजीपणाचा ठपका ठेवत दोन डॉक्टरांसह पाच जणांना दोन वर्षांचा कारावास

एमपीसी न्यूज – प्रसूतीसाठी आलेल्या महिलेच्या प्रसूतीनंतर (Pimpri) उपचारांमध्ये निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत औंध रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ञ, अन्य एक डॉक्टर आणि तीन परिचारिकांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. पिंपरी न्यायालयाचे न्यायाधीश एन आर गजभिये यांनी हा निकाल दिला आहे.

डॉ. अर्पिता प्रदीप बावरकर, डॉ. आत्माराम व्यंकटराम शेजूळ, परिचारिका मनीषा जोशी, उज्वला नागपुरे, शुभांगी कांबळे अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.

फिर्यादी महिला सन 2011 मध्ये औंध जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाल्या. त्यांची प्रसूती झाली. मात्र त्याचे एक दिवसाच्या अर्भकाचा मृत्यू झाला. यावेळी डॉ. अर्पिता या स्त्रीरोगतज्ञ होत्या. याप्रकरणी फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

Maharashtra : राज्यातील सर्व शासकीय वसतिगृहांतील महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य – चंद्रकांत पाटील

हे प्रकरण न्यायालयात आल्यानंतर आरोपींच्या निष्काळजीपणामुळे फिर्यादी यांचे बाळ मयत झाल्याचे निष्पन्न झाले. न्यायाधीश एन आर गजभिये यांच्या न्यायालयात हा खटला चालला. न्यायालयाने आरोपींना दोन वर्षे कारावास आणि प्रत्येकी 50 हजार रुपये आर्थिक दंड. दंड न भरल्यास सात दिवस साधा कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

आरोपींकडून जमा होणाऱ्या दंडातून एक लाख रुपये फिर्यादी यांना (Pimpri) देण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले आहेत. सहायक सरकारी अभियोक्ता साधना बोरकर, संजय राठोड यांनी फिर्यादीच्या वतीने कामकाज पाहिले. पोलीस हवालदार संतोष गायकवाड आणि पोलीस हवालदार प्रदीप साबळे यांनी न्यायालयाच्या कामकाजास मदत केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.