Today’s Horoscope 22 April 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 22 April 2023
वार – शनिवार.
22.04.2023
शुभाशुभ विचार- शुभ दिवस
आज विशेष- अक्षय्य तृतीया.
राहू काळ – सकाळी 09.00 ते 10.30
दिशा शूल- दक्षिणेस असेल.
आजचे नक्षत्र – कृत्तिका 23.24 पर्यंत नंतर रोहिणी.
चंद्र राशी – वृषभ.
—————————————-
मेष – ( शुभ रंग- गुलाबी )
राशीच्या धनस्थानात भ्रमण करणारा चंद्र काहीतरी आकस्मिक लाभ देईल. गृहिणींना अनपेक्षित येणाऱ्या पाहुण्यांची उठ बस करावी लागेल. आज शब्द जपून वापरा. खरे बोलण्यापेक्षाही गोड बोलणे महत्त्वाचे राहील.

वृषभ (शुभ रंग- राखाडी )
आज तुमच्या वागण्यात इतरांना जरासा अहंपणा जाणवेल. तुम्ही स्वतःचेच खरे करण्याचा प्रयत्न कराल. अति स्पष्ट बोलल्यामुळे आज तुमचे हितचिंतक दुखावतील.

मिथुन ( शुभ रंग- आकाशी )
कंजूषपणा करून चालणार नाही. आज असे काही खर्च उद्भवतील की जे टाळता येणे शक्य नाही. उच्च अधिकारी वर्गास कार्यालयीन कामासाठी दूरचे प्रवास घडतील.

कर्क (शुभ रंग- मरून)
आज तुमची काही विसरलेली येणी ही अनपेक्षित पणे वसूल होऊ शकतील. नवविवाहितांची संसारिक स्वप्ने साकार होतील. नवीन व्यावसायिकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होतील.

सिंह (शुभ रंग- लाल )
आज कार्यक्षेत्रात काही आव्हानात्मक प्रसंगांना तोंड द्यावे लागेल. तुमच्या अंगी असलेले नेतृत्व गुण कामी येतील. कामाच्या व्यापात कुटुंबीयांना वेळ देणे अवघड होऊन बसेल.

कन्या ( शुभ रंग- हिरवा)
कार्यक्षेत्रात काही विरोधी घटनांना तोंड द्यावे लागले तरी तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज दैवाची उत्तम साथ लाभेल. नोकरदारांनी वरिष्ठांच्या आज्ञेत राहिलेले बरे.

तूळ ( शुभ रंग- मरून)
कार्यक्षेत्रात अचानक उद्भवणाऱ्या काही अडचणींचा सामना करावा लागेल. नोकरीदारांनी बिनचूक कामास प्राधान्य देणे गरजेचे. कोणत्याही प्रकारचे धाडस आज तरी नको.

वृश्चिक (शुभ रंग- राखाडी)
आज समोर येणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्या प्रभावात राहील. काही खोटी स्तुती करणारे मित्र भेटतील. सतर्क रहा. वैवाहिक जीवनात दोघात तिसरा अजिबात येऊ देऊ नका.

धनु- (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज तुम्हाला काही आरोग्य विषयक समस्या त्रस्त करतील. तज्ञ डॉक्टरांचा सल्ला वेळीच घेणे गरजेचे आहे. धंद्यातील काही येणी आज अनपेक्षितपणे वसूल होऊ शकतील.

मकर ( शुभ रंग- सोनेरी )
नोकरदारांना तेच तेच काम कंटाळवाणे वाटेल. जुन्या ओळखीतून काही व्यवसाय वृद्धीच्या संधी चालून येतील. गुढ शास्त्रांचा अभ्यास करणाऱ्यांना एखादी प्रचिती येऊ शकते.

कुंभ (शुभ रंग – जांभळा)
कौटुंबिक स्तरावरील काही मनाजोगत्या घटना तुमचा कार्य उत्साह वाढवतील. मुलांची अभ्यासातील प्रगती समाधानकारक राहील. आज पुरेसा पैसाही उपलब्ध होईल.

मीन -(शुभ रंग – पांढरा ) – Today’s Horoscope 22 April 2023
बरेच दिवसापासून रखडलेल्या घरगुती कामात आज तुम्हाला लक्ष घालावे लागेल कदाचित वाहन दुरुस्तीसाठी खर्च करावा लागेल मुलांना आज अभ्यासाचा कंटाळा येईल.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

Vaishakh : ओळख मराठी महिन्यांची – भाग 2 – असह्य उकाड्यातही आंब्याचा गोडवा देणारा ‘वैशाख’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.