Today’s Horoscope 22 May 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 22 May 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – सोमवार

22.05.2023.

शुभाशुभ विचार- उत्तम दिवस.

आज विशेष- साधारण दिवस.

राहू काळ – सकाळी 07.30  ते  09.00. 

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आजचे नक्षत्र – मृग 10.37 पर्यंत नंतर आर्द्रा.

चंद्र राशी –  मिथुन.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- चंदेरी )

आज जुन्या ओळखीतून काही व्यवसाय वृद्धीच्या संधी चालून येतील. केवळ चर्चेपेक्षा आज झटपट निर्णय घेणे योग्य ठरेल. गृहिणींना आज माहेरची ओढ लागेल.

वृषभ (शुभ रंग- गुलाबी )

मृदू वाणीने आज तुम्ही विरोधकांनाही आपले म्हणणे पटवून देऊ शकाल. धंद्यात येणे अनपेक्षित पणे वसूल होइल. आवक पुरेशी असली तरीही अनावश्यक खर्च टाळायला हवा.

मिथुन ( शुभ रंग- सोनेरी )

महत्त्वाच्या चर्चेत इतरांचेही म्हणणे ऐकून घ्या. समोरची व्यक्ती आपल्यापेक्षाही हुशार असू शकते याचे भान असावे. तुमचा लहरी व संशयी स्वभाव काबूत ठेवा.

कर्क (शुभ रंग- आकाशी.)

हाती असलेल्या पैशाची उधळपट्टी करू नका. कदाचित आज दिवसाच्या उत्तरार्धात एखादा मोठा खर्च उद्भवेल. एखादी चीज वस्तू गहाळ होईल सतर्क रहा. घराबाहेर वाद टाळा.

सिंह (शुभ रंग- पिस्ता )

आजच्या दिवसातील काही मनाजोगत्या घटना तुमचा कार्य उत्साह वाढवतील. खोटी स्तुती करणाऱ्यांपासून मात्र सावध राहा. विरोधकही आज मैत्रीचा हात पुढे करतील.

कन्या ( शुभ रंग- मोरपंखी)

नोकरीत वरिष्ठांची शाब्बासकी मिळवाल. अधिकार योग चालून येतील. वडील आज तुम्हाला योग्यच सल्ले देतील. सकारात्मक दृष्टिकोन बाळगा आणि कर्तव्यास प्राधान्य द्या.

तूळ ( शुभ रंग- पांढरा)

नोकरी धंद्यात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येईल. आज हातचे सोडून पळत्या मागे धावायचा मोह टाळा. झटपट लाभाचा मोह धरू नका. स्वतःवर संयम असू द्या

वृश्चिक (शुभ रंग- क्रीम)

आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. मोठे आर्थिक व्यवहार किंवा मोठ्या उपक्रमांची सुरुवात उद्यावरच ढकला. आज ज्येष्ठांची पावले सत्संगाकडे आपोआप वळतील.

धनु- (शुभ रंग- केशरी)

सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. भागीदारीच्या व्यवहारात पारदर्शकता ठेवा. आज एखादा विवाह जुळवण्यात तुम्ही यशस्वी मध्यस्थी करू शकाल.

मकर ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

नोकरदारांवर वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. आज तब्येत थोडी नरमच राहील जुनी दुखणी अंगावर काढू नका. पती-पत्नी मधील काही मतभेद सामंजस्याने मिटतील.

कुंभ (शुभ रंग – मरून)

तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज दैवाची उत्तम साथ लाभेल. स्वतःचे छंद जपण्यासाठी वेळही काढू शकाल. तुमच्या कामातील उत्साहाचा तुमच्या विरोधकांनाही हेवा वाटेल.

मीन -(शुभ रंग – निळा )

मंदावलेल्या व्यापारास पूर्ववत गती येईल. कार्यक्षेत्रात आपली मते इतरांना पटवून देता येतील. आज स्थावर असे व्यवहार लाभ देतील आज आईने दिलेले सल्ले महत्वपूर्ण असतील.

शुभम भवतु
श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क-9689165424.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.