Today’s Horoscope 24 January 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग -Today’s Horoscope 24 January 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – बुधवार.

तारीख – 24.01.2024.

शुभाशुभ विचार – चांगला दिवस.

आज विशेष – साधारण दिवस.

राहू काळ – दुपारी 12.00 ते 1.30.

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आज नक्षत्र – आर्द्रा 6.36 पर्यंत नंतर पुनर्वसु.

चंद्र राशी – मिथुन.
—————————–
मेष – ( शुभ रंग – केशरी)

शेजाऱ्यांशी क्षुल्लक करणारे झालेले गैरसमज दूर होऊन सलोखा वाढेल. काही जणांना अचानक जवळपासच्या प्रवासाला निघावे लागू शकते. घराबाहेर वाद टाळावेत.

वृषभ ( शुभ रंग- डाळिंबी)

वाढत्या खर्चातही पैशाची कमतरता जाणवणार नाही. कार्यक्षेत्रात तुमच्या नेतृत्वगुणांना चांगला वाव मिळेल. गायक कलाकारांना आज रसिक मनसोक्त दाद देतील.

मिथुन – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

जिथे जाल तिथे आज आपलीच मर्जी चालवायचा तुम्ही प्रयत्न कराल. घाई गर्दीत आज तुम्ही काही चुकीचे निर्णय घ्याल. उपवर असाल तर आज सुयोग्य स्थळे चालून येतील.

कर्क – ( शुभ रंग – मोतिया)

विविध मार्गाने आलेला पैसा विविध मार्गाने जाईल. आज तुम्ही सहकुटुंब चैन कराल. जोडीदाराला एखादे सरप्राईज गिफ्ट द्याल. आज गरजेपुरतेच अध्यात्मिकही व्हाल.

सिंह -( शुभ रंग – पांढरा)

आज दैवाचे पाठबळ उत्तम असल्याने तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश नक्की मिळेल. आज सज्जनांचा सहवास लाभेल. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल.

कन्या – ( शुभ रंग- हिरवा)

आज ऑफिसमध्ये कामाचा प्रचंड ताण असणार आहे. कामाच्या व्यापात घरगुती प्रश्न दुर्लक्षित होतील. आज कुटुंबीयांची नाराजी पत्करावी लागेल. अतिव्यस्त दिवस.

तूळ – ( शुभ रंग- राखाडी)

कोणतेही नवे उपक्रम सुरू करण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. व्यवसायात काही अनपेक्षित अडचणी येऊ शकतात. आज आईच्या तब्येतीची विचारपूस करा.

वृश्चिक – ( शुभरंग – गुलाबी)

हितशत्रू कदाचित मित्रांमध्येच लपलेले असू शकतात. कोणतीही धाडसाची कामे आज टाळा. सदैव सतर्क रहा. आज कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका.

धनु – (शुभ रंग- भगवा)

आज तुम्ही इतरांच्या भांडणात यशस्वी मध्यस्थी कराल. एकतर्फी प्रेमाला आज समोरून होकार मिळण्याची चिन्हे दिसू लागतील. वैवाहिक जीवनातील लज्जत वाढेल.

मकर – (शुभ रंग- चंदेरी)

कोणतीच गोष्ट सहज साध्य नसली तरीही आज तुमची काही येणी असतील तर ती वसूल होण्याची शक्यता आहे. प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ नक्की मिळेल.

कुंभ – शुभ रंग- निळा)

काही रसिक मंडळी तर आज कामावर दांडी मारूनही मौज मजेस प्राधान्य देतील. नवोदित कलाकार मंडळी प्रसिद्धीच्या झोतात राहतील. खेळाडू स्पर्धा जिंकतील.

मीन-  ( शुभ रंग- सोनेरी)

आज कुठेच न जाता घरी मस्त आराम करायचा तुमचा मूड असेल. आईने दिलेले सल्ले योग्यच असतील. आज गृहिणींना मुलांच्या अभ्यासात लक्ष घालावे लागेल.

श्री जयंत कुळकर्णी.
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.
फोन – 9689165424.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.