Pune : आक्षेपार्ह बॅनरवरून हिंदुत्ववादी संघटनेची एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांना मारहाण

एमपीसी न्यूज – फिल्म अँण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये  (FTII) विद्यार्थ्यांना मारहाण ( Pune ) झाल्याचा प्रकार समोर आला आहे. FTII मधील विद्यार्थी संघटनांकडून बॅनर झळकवण्यात आले होते. त्यावर आक्षेप घेत हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी कॅम्पसमध्ये घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केली. या सगळ्या प्रकारानंतर आता पुण्यातील डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले आहे. संस्थेच्या प्रवेशद्वाराजवळ पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Today’s Horoscope 24 January 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एफटीआयआयमध्ये विद्यार्थी संघटनांकडून वादग्रस्त बॅनरबाजी करण्यात आली. यामध्ये बाबरी मशिदीचा उल्लेख होता.  .अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर हे बॅनर लावण्यात आलं होतं . या वादग्रस्त बॅनरबद्दल हिंदुत्वादी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांना  समजलं आणि या कार्यकर्त्यांनी एफटीआयआयमध्ये घुसून या बोर्ड लावणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे.

पोलिसांनी मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी पाठवलं आहे. एफटीआयआय कॉलेजमध्ये सध्या तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, या वादानंतर संस्थेच्या आवारातून बाबरी मशिदीचा उल्लेख असलेला बॅनर काढण्यात ( Pune ) आला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.