Today’s Horoscope 28 February 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग – वार – रविवार, ​दि​.28 फेब्रुवारी 2021

  • शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
  • आज विशेष — गुरुप्रतीपदा.
  • राहू काळ – संध्याकाळी  4.30 ते 06,00
  • दिशा शूल – पश्चिमेस असेल.
  • आजचे नक्षत्र – पूर्वाफाल्गुनी 09.36 पर्यंत नंतर उत्तरा फाल्गुनी.
  • चंद्र राशी – सिंह 15.07 पर्यंत नंतर कन्या.

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग –  डाळिंबी)

दिवस तितकासा अनुकूल नसला तरीही आज काही येणी असतील तर ती अनपेक्षितपणे वसूल होतील. खेळाडू स्पर्धा जिंकतील. आज जिभेचे चोचले पुरवू नका. पोट बिघडेल.

वृषभ – ( शुभ रंग – पिस्ता)

नोकरीच्या ठिकाणी काही कंटाळवाणी कामे करावी लागतील. आज तुम्ही आपल्या कुटुंबियांस पुरेसा वेळ देण्याचा प्रयत्न कराल. गृहिणी आज संध्याकाळी मॉलमध्ये फेरफटका मारतील

मिथुन – ( शुभ रंग- पांढरा)

आज शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यवसायात चांगले चालतील. विद्यार्थ्यांची अभ्यासातील प्रगती कौतुकास्पद राहील. कलाकारांना निर्मात्यांचे उंबरठे झिजवावे लागतील.

कर्क – (शुभ रंग – राखाडी)

आज पैशाची कमतरता भासणार नाही. एखाद्या मित्रास आज मदत कराल. स्थावर खरेदी-विक्रीच्या कागदपत्रांवर सह्या करताना सतर्क राहावे. गृहिणींनी सासुबाई कडून शाबासकीची अपेक्षा अजिबात ठेवू नये.

सिंह – (शुभ रंग- भगवा)

आज हट्टीपणास लगाम घालून इतरांचेही विचार ऐकून घ्यायची तयारी ठेवा. आज इच्छापूर्तीचा दिवस आहे. उपवरांना  योग्य स्थळांचे प्रस्ताव येणार आहेत. जोडीदाराशी एकमत राहील.

कन्या – ( शुभ रंग – हिरवा)

आज महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मनस्थिती होणार आहे. नवीन उपक्रमांची सुरुवात उद्यावर ढकलली तर बर होईल. गृहिणींना घरातील थोरांशी जुळवून घ्यावे लागेल.

तूळ – ( शुभ रंग- केशरी)

ज्येष्ठ मंडळींनी आज प्रकृतीची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. देण्यघेण्याचे व्यवहार लिखित स्वरूपात करावेत. दूरच्या प्रवासात काही चांगल्या व्यक्तींशी हितसंबंध जुळून येतील.

वृश्चिक – ( शुभ रंग- नारंगी)

व्यापार उद्योगाची मंदावलेली गती पूर्वपदावर येईल. अपुरे आर्थिक व्यवहार पूर्ण होतील. इच्छित ध्येय साध्य होतील. संततीचे विवाहयोग जुळतील. ध्यानीमनी नसताना काही जुनी येणी वसूल होतील.

धनु – ( शुभ रंग- गुलाबी)

नोकरीच्या ठिकाणी प्रमोशनची चाहूल लागेल. अधिकारी वर्गाच्या तुमच्या बद्दलच्या अपेक्षा वाढतील. नकारात्मक विचारांच्या लोकांपासून दोन हात दूरच रहा. महत्त्वाची कामे दुपार पूर्वीच करून मोकळे व्हा.

मकर – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आज तुम्हाला कार्यक्षेत्रात काही अनपेक्षित अडचणी येतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आपल्यावर खूष आहेत अशा भ्रमात राहू नका, हाताखालच्या मंडळीत मिळून-मिसळून रहा. ज्येष्ठांना सत्संगाची ओढ लागेल.

कुंभ – (शुभ रंग- आकाशी)

व्यवसायिक चढ-उताराचा सामना करावाच लागणार आहे. प्रत्येक निर्णय विचारांती घ्यायला हवा. ध्येय साध्य करण्यासाठी अथक परिश्रमाशिवाय दुसरा पर्याय नाही.

मीन – ( शुभ रंग- मोरपंखी)

भावना व कर्तव्य यांचा समन्वय साधणे जरा कठीण जाईल. एखाद्या मंगल कार्यात हजेरी लावाल. वैवाहिक जोडीदाराकडे मन मोकळे करावेसे वाटले तरी हातचे राखूनच बोलणे हिताचे राहील.
!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.