Today’s Horoscope 28 January 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग -Today’s Horoscope 28 January 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – रविवार.

तारीख – 28.01.2024.

शुभाशुभ विचार – 17 पर्यंत चांगला दिवस.

आज विशेष – साधारण दिवस.

राहू काळ – सायंकाळी 4.30 ते 06.00.

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आज नक्षत्र – मघा 15.23 पर्यंत नंतर पूर्वा फाल्गुनी.

चंद्र राशी – सिंह.
—————————–

मेष – ( शुभ रंग – निळा)

विविध मार्गाने अर्थप्राप्ती होईल. सौंदर्यप्रसाधनांचे व्यवसाय आज तेजीत चालतील. रुग्णांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा दिसून येईल.

वृषभ – ( शुभ रंग- आकाशी)

आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून आज कुटुंबीयांना आपल्या जास्तीत जास्त वेळ देण्याचा तुमचा प्रयत्न असेल. रियल इस्टेटचे व्यवसायही आज तेजीत चालतील.

मिथुन – ( शुभ रंग- पांढरा)

विविध मार्गाने येणारा पैसा विविध मार्गाने जाणार आहे. जास्तीत जास्त वेळ आज तुम्ही घराबाहेर असाल. घराबाहेर वावरताना वादविवाद टाळा. शेजारी सलोखा राहील.

कर्क – ( शुभ रंग -)

आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असेल. कार्यक्षेत्रात तुमचा आत्मविश्वास वाढवणाऱ्या काही घटना घडतील. महत्त्वाच्या चर्चेत आपल्या मताशी तुम्ही ठाम असाल.

सिंह – ( शुभ रंग – आकाशी)

व्यवसायात भागीदारांशी एकमत असेल. अडचणीच्या प्रसंगी जोडीदाराची खंबीर साथ राहील. दुरावलेल्या नात्यातील गैरसमज दूर होऊन सलोखा वाढेल.

कन्या – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आज तुम्ही आर्थिक व्यवहारात सावध रहा. भावनेच्या भरात कुणालाही शब्द देऊ नका. रात्रीच्या प्रवासात झोपू नका. आपल्या किमती वस्तूंची काळजी घ्यायला हवी. खर्च वाढणार आहे.

तूळ – ( शुभ रंग- मोतिया)

आज उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल दिवस असून सर्व महत्त्वाची कामे उरकूनच घ्या. मोठे आर्थिक व्यवहार यशस्वी होणार आहेत. जुनी गुंतवणूक चांगला नफा देईल.

वृश्चिक – ( शुभरंग – सोनेरी)

आज तुम्ही आपले अधिकार वापरून इतरांची कामे करून द्याल. अधिकारी वर्गाचे ही आज तुम्हाला चांगले सहकार्य असेल. आज तुम्ही फक्त आपल्या कर्तव्यास प्राधान्य द्याल.

धनु – (शुभ रंग- जांभळा)

नोकरी धंद्यात काही मनाविरुद्ध घटना घडतील व त्यामुळे तुम्हाला नैराश्य येईल. पण हातचे सोडून पळत्याच्या मागे धावणे टाळा. ज्येष्ठ मंडळींना उपासनेची प्रचिती येईल.

मकर- (शुभ रंग- केशरी)

नोकरी धंद्यातील काही मनाविरुद्ध घटनांमुळे तुम्ही बेचैन असाल. कार्यक्षेत्रात अनुभवींचे सल्ले उपयुक्त ठरणार आहेत. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा.

कुंभ – (शुभ रंग- पिस्ता)

कार्यक्षेत्रात नवीन आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकाराल. आज वाणीत गोडवा ठेवाल तर अनेक किचकट कामे सोपी होतील. वैवाहिक जीवनात गोडी गुलाबी वाढेल.

मीन – ( शुभ रंग- क्रीम)

नोकरदारांसाठी आजचा दिवस अनुकूल असून तुम्ही केलेल्या कष्टांचे चीज होईल. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. अधिकारी कामगारांचे प्रश्न सोडवतील.

श्री जयंत कुळकर्णी.
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.
फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.