Pimpri : प्रजासत्ताक दिनानिमित्त साकोसा मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित;150 रक्तदात्यांनी रक्तदान केले .

एमपीसी न्यूज – साकोसां मित्रमंडळ पिंपरी चिंचवड च्या वतीन(Pimpri ) प्रजासत्ताक दिनानिमित्त रूपीनगर विभागातर्फे रक्तदान शिबीर आयोजित केले होते, या शिबिरामध्ये 150 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

साकोसा मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी 26 जानेवारी रोजी (Pimpri )रक्तदान शिबीर राबविण्यात येते , या वर्षी या उपक्रमाचे हे 11 वे वर्ष होते. यासाठी स्थानिक नागरिकांचे विशेष सहकार्य लाबत आहे.

Pune : पुण्यात घरगुती पाईप गॅसची संख्या वाढविण्यासाठी विशेष मोहीम

डॉ. गोसावी हॉस्पिटल रुपीनगर येये हा कार्यक्रम घेण्यात आला. डॉ गोसावी व त्यांचे सहकारी यांचे देखील सहकार्य लाभले.

या कार्यक्रमास स्थानिक मान्यवर माजी नगरसेवक उत्तम कैंदळे, पंकज भालेकर ,सामाजिक कार्यकर्त्या गिते ताई, उद्योजक आप्पा नरळे, वेरेणेकर सर, यशवंतराव चव्हाण स्मारक समिती अध्यक्ष, सुनिल जाधव, अनिल भोसले,सातारा जिल्हा मित्र मंडळ अध्यक्ष गोपीचंद जगताप, अशोक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल गवते, संदिप रागोळे, गोरख लोहार, दत्ता खिलारे, दत्ता खरे, बापू सुर्यवंशी, शरद पाटील व सदाशिव पडळकर यांनी सहकार्य केले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.