Pune : वाहतूक विभागाच्या कारवाईत आठवडाभरात 91,36,000 रुपयांचा दंड वसूल

तब्बल 40, 735 बेशिस्त वाहन चालकांवर केली कारवाई 

एमपीसी न्यूज – बेशिस्त वाहन चालकांना चाप बसावा यासाठी गेल्या आठवडाभरापासून पुणे वाहतूक विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत केवळ आठवडाभरात पोलिसांकडून तब्बल 40 हजार 735 बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करीत त्यांच्याकडून 91 लाख 36 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई दि. 10 ते 16 ऑगस्ट या कालावधीत करण्यात आली. 

यामध्ये दारु पिऊन वाहन चालविणे, अल्पवयीन बालकांनी वाहन चालविणे, भरधाव वेगाने वाहने चालविणा-यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईचा तपशील खालील प्रमाणे…

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.