Chakan : उसने दिलेले पैसे मागितल्यावरून तरुणाला अपहरण करून मारहाण

एमपीसी न्यूज – चार महिन्यांपूर्वी घर बांधण्यासाठी हातउसने म्हणून 11 हजार रुपये दिले. हे पैसे नंतर परत मागितल्याचा राग मनात धरून पाच जणांनी मिळून तरुणाचे अपहरण करून मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 15) रात्री साडेसातच्या सुमारास चाकणमधील हॉटेल ड्रीमलँड समोर घडली.  

अमित संजय साळवे (वय 19, रा. जय भारत चौक, चाकण, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रोहित मिसर, अजिंक्य राणे, दीपक परदेसी, आदित्य मेदनकर, महादू (पूर्ण नाव माहिती नाही, सर्व रा. चाकण ता. खेड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित यांनी रोहित याला घर बांधण्यासाठी 11 हजार रुपये हातउसने दिले होते. हे पैसे दिलेल्या मुदतीत परत न केल्याने अमित यांनी दिलेल्या पैशाची वेळोवेळी फोन करून मागितले. अमित बुधवारी कळंब येथे जाण्यासाठी निघाले. पुणे-नाशिक रोडवर रात्री साडेसातच्या सुमारास थांबले असता, वारंवार पैसे मागितल्याचा राग मनात धरून रोहित आणि अजिंक्य यांनी अमितला पैसे देतो असे सांगून मोटारसायकलवर बसवून नेले. बालाजी नगर मेदनकरवाडी येथे रोहित याच्या पानटपरीवर अन्य आरोपी होते. सर्वांनी मिळून अमित याला पळवून मारले. यामध्ये अमित जखमी झाले. याबाबत पोलिसांत तक्रार दिल्यास घरदार जाळून टाकीन अशी धमकी आरोपींनी अमितला दिली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.