Hadapsar : तू माझ्याशी का बोलत नाहीस, या रागातून तरुणीचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न

आरोपी तरुणीला हडपसर पोलिसांनी केली अटक

एमपीसी न्यूज – तू माझ्या सोबत का बोलत नाहीस. तुला जीवे ठार मारून टाकेन असे म्हणत 19 वर्षीय तरुणीचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या आरोपीला जेरबंद करण्यात हडपसर (Hadapsar) पोलिसांना यश आले आहे.

PCMC : रस्त्यावरील खड्डे बुजवा; नागरिकांची जनसंवाद सभेत मागणी

आजीम आयुब मुलाणी वय 23 वर्षे, राहणार वडकी असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी 19 वर्षीय तरुणी आणि आरोपी आजीम आयुब मुलाणी हे एकाच परिसरात राहण्यास आहेत. त्या दोघांची चांगली मैत्री होती. तर फिर्यादी तरुणीच्या कुटुंबीयांना आरोपी सोबत बोलणे मान्य नव्हते.

तू त्याच्या सोबत बोलू नकोस असे सांगितले. त्यामुळे, फिर्यादी या आरोपी सोबत बोलत नव्हत्या. अनेक वेळा कॉल करुन आरोपीने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद फिर्यादी तरुणीने दिला नाही.

फिर्यादी या 22 जुलै रोजी रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास रवीदर्शन चौकामध्ये थांबल्या होत्या.त्यावेळी आरोपी आजीम आयुब मुलाणी याने जबरदस्तीने फिर्यादी यांना चार चाकी गाडीमध्ये बसवून अ‍ॅमनोरा मॉल येथे घेऊन गेला. तू माझ्याशी का बोलत नाही. तू जर माझ्याशी बोलली नाहीस, तर तुला जीवे ठार मारेल असे म्हणत गळा दाबण्याचा प्रयत्न केला.

त्याच्या तावडीतून सुटून फिर्यादीने आमच्याकडे आरोपी आजीम आयुब मुलाणी विरोधात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.  पुढील तपास सुरू असल्याच हडपसर पोलिस स्टेशनच्या सहायक निरीक्षक सारिका जगताप यांनी माहिती दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.