Chinchwad : तुकाराम महाराज पालखी चिंचवड गावात मुक्कामी थांबविण्यात यावी

श्री काळभैरवनाथ उत्सव समिती, चिंचवड देवस्थान ट्रस्ट, चिंचवड ग्रामस्थ यांची मागणी 

एमपीसी न्यूज – श्री संत तुकाराम महाराज पालखीचे परतीच्या प्रवासाचे आगमन बुधवारी पिंपरी-चिंचवड शहरामध्ये होत आहे. चिंचवड गावात मुक्कामी ही पालखी थांबविण्यात यावी अशी मागणी श्री काळभैरवनाथ उत्सव समिती, चिंचवड देवस्थान ट्रस्ट, चिंचवड ग्रामस्थ यांनी देहु संस्थान यांच्याकडे लेखीनिवेदनांद्वारे केली आहे. 

दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, जगदगुरु श्रीसंत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा चिंचवडगावात यावा यासाठी देहु संस्थानकडे पदाधिका-यांनी मागणी केली होती. त्याचाच एक भाग म्हणून बुधवार दि. 8 ऑगस्टला सकाळी सात वाजता श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी पिंपरी-चिंचवड लिंक रस्त्याने चिंचवडगावातील मोरया हॉस्पिटलच्या समोरील बसस्थानकाच्या जागेत येणार आहे. याठिकाणी श्रीसंत तुकाराम महाराज व श्रीमन महासाधु मोरया गोसावी यांच्या एकत्रित पालखी दर्शऩाचा सोहळा भाविकांना होणार आहे. तरी या तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम चिंचवडगावात करावा अशी ही मागणी त्यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.