Two Bodies Found: शेततळ्यात बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश

एमपीसी न्यूज: शेततळयात बुडालेल्या मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. धायरी, रायकर मळा, खंडोबा मंदिरालगत असलेल्या शेततळयात दोन मुले (अंदाजे वय 14) बुडाली होती. (Two Bodies Found) या मुलांचे मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

आज सकाळी 09:53 वाजता धायरी, रायकर मळा, खंडोबा मंदिराजवळ असणारया शेततळ्यामधे दोन मुले पाण्यात बुडाल्याची बातमी दलाच्या नियंत्रण कक्षास मिळाली. तातडीने सिहंगड अग्निशमन केंद्र व पीएमआरडीए अग्निशमन केंद्र येथून दोन वाहने रवाना करण्यात आली होती.

अग्निशमन वाहने पोहोचताच गळाच्या साह्याने 14 मिनिटात दोन ही  मुलांचे (नावे 1 सुरज शरद सातपुते, वय 14 व 2 पुष्कर गणेश दातखिंडे, वय 13) दोघे ही राहणार धायरी, नालंदा हायस्कुल शेजारी)  या दोघांचे मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

Rahul Narvekar : शिंदे सरकारचा पहिला विजय; विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.