Rahul Narvekar : शिंदे सरकारचा पहिला विजय; विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर

एमपीसी न्यूज – नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार आज पहिल्या चाचणीत यशस्वीपणे उत्तीर्ण झाले. विधानसभा अध्यक्ष भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची बहुमताने निवड झाली आहे. त्यांना 164 मते मिळाली तर महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना 107 मते मिळाली.

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत भाजपच्या राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना 288 पैकी 164 मते मिळाली तर महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना 107 मते मिळाली. तीन सदस्यांनी मतदानात तटस्थ म्हणून मत नोंदवले. बहुमतासाठी आवश्यक 144 मतांपेक्षा अधिक मते मिळाल्याने नार्वेकर विजयी झाले. त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा  मतांनी पराभव केला.

राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याची अधिकृत घोषणा पीठासन अधिकारी नरहरी झिरवळ यांनी केली. झिरवळ यांनी नार्वेकर यांचे अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर नार्वेकर यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारले.

प्रारंभी आवाजी मतदान घेण्यात आले, मात्र त्यात चित्र स्पष्ट न झाल्याने शिरगणती पद्धतीने मतदान घेण्याचा निर्णय झिरवळ यांनी जाहीर केला. या मतदानात समाजवादी पार्टी व एमआयएमने तटस्थ रहात मतदान न करण्याचा निर्णय घेतला.

अधिवेशनाच्या प्रारंभी नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व नवे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सभागृहाला परिचय करून देण्यात आला.

बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल. सर्वात तरूण अध्यक्ष म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नार्वेकर यांचे अभिनंदन. तरूण सहकारी मिळाल्याचा आनंद.

16 सदस्यांनी पक्षाविरोधात मतदान केल्याची नोंद.

 

 

Shivaji Rao Adhalrao Patil: माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांची शिवसेनेतून हकालपट्टी

Shivsena : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या PA कडून धमकीचा फोन? शिवसेना सहसंपर्क प्रमुखांचा मोठा आरोप, राजकीय क्षेत्रात खळबळ

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.