Shiv Sena MLA Disqualification : उद्धव ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळेल – शरद पवार

एमपीसी न्यूज : आज विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Shiv Sena MLA Disqualification) शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असल्याचा निर्णय दिला. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हंटले, की आजच्या निकालात यत्कचिंतही आश्चर्य नाही. आम्ही आपसात चर्चा करायचो की हा निकाल उद्धव ठाकरे यांना अनुकूल नसणार. तसेच मुख्यमंत्र्यांना हा निकाल त्यांच्या बाजूने लागेल हा आत्मविश्वास आहे. पुढे ते म्हणाले, की उद्धव ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयात जावे लागेल आणि तिथे उद्धव ठाकरेंना न्याय मिळेल अस आजच्या वर्डींग्जवरून वाटत आहे.  

शरद पवार म्हणाले, की विधिमंडळापेक्षा पक्ष संघटना महत्वाची असते. हा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मात्र विधिमंडळाचे अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी वेगळा निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या निकालानुसार व्हीप बजावण्याचा अधिकार पक्ष संघटनेला असतो. विधिमंडळाला नाही.

राहूल नार्वेकरांनी दोन्ही बाजूंना पात्र ठरवलय. नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाची गाईड लाईन बदलली आहे. सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी उद्धव ठाकरे यांना संधी आहे. उद्धव ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळेल.

Pune : पुणे लोकसभेचा उमेदवार दिल्लीतून ठरणार

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने राहिलेत. या निकालाचा आमच्यावर परिणाम होणार नाही. नार्वेकर यांनी दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पायमल्ली आहे हे सांगण्याची संधी (Shiv Sena MLA Disqualification) आम्हाला महाविकास आघाडीला प्राप्त झाली. आम्ही तो कार्यक्रम लवकरच सुरु करू. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना ही खरी शिवसेना हे लोकांना माहीत आहे.

राष्ट्रवादी बाबतीत देखील असच होईल का? या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की निकाल दोन दिवसांवर आला असताना नार्वेकर मुख्यमंत्र्यांना भेटायला जात असतील तर निकाल स्पष्ट होता. त्यामुळे इतरांच्या बाबतीत देखील असाच निकाल येईल अशी शक्यता आहे.  भरत गोगावले यांना व्हीपचा दिलेला अधिकार हा वादाचा विषय ठरू शकेल. त्यांच्यामुळे मशाल मोकळी झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.