Pune : पुणे लोकसभेचा उमेदवार दिल्लीतून ठरणार

एमपीसी न्यूज – पुणे शहर काँग्रेसच्या आवाहनानंतर पुणे लोकसभा निवडणुकीसाठी (Pune)आजी-माजी आमदारांसह २० नेत्यांनी आपली इच्छा प्रदर्शित करून अर्ज दाखल केले आहेत. शहर काँग्रेसकडून इच्छुकांची यादी प्रदेश काँग्रेसला पाठविण्यात येईल.

प्रदेशकडून छाननीनंतर काही नावे दिल्लीला कळविण्यात येणार (Pune)आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गेल्या आठवड्यात पुणे दौरा केला असून, त्यानंतर काँग्रेसकडूनही निवडणूक तयारीचा वेग वाढविण्यात आला आहे. पुणे लोकसभेचा उमेदवार दिल्लीतून ठरविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Moshi : अवैध दारूभट्टीवर पोलिसांचा छापा

पुणे लोकसभा निवडणुकीसाठी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, आमदार रविंद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी, प्रवक्ते गोपाळ तिवारी, प्रदेश सरचिटणीस ऍड. अभय छाजेड, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार अनंत गाडगीळ, माजी आमदार दीप्ती चवधरी, संजय बालगुडे, माजी उपमहापौर आबा बागुल, माजी नगरसेवक दत्ता बहिरट, विरेंद्र किराड, संगीता तिवारी, नरेंद्र व्यवहारे, प्रदेश प्रतिनिधी यशराज पारखी, मुकेश धिवार, राजू कांबळे, मानोज पवार, संग्राम खोपडे, दिग्विजय जेधे, असे 20 जण पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढविण्यासाठी प्रबळ इच्छुक उमेदवार आहेत.

दरम्यान, भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होणे गरजेची होती. ती निवडणूक न झाल्याबद्दल उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला सुनावले. आता सार्वत्रिक निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे.

माजी महापौर मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. त्यामध्ये रविंद्र धंगेकर विजयी झाले. त्यामुळे आता काँग्रेसचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही पुणे लोकसभा मतदारसंघ जिंकणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांना काँग्रेसचा प्रचार करावा लागणार आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.