Moshi : अवैध दारूभट्टीवर पोलिसांचा छापा

एमपीसी न्यूज – अवैध दारूभट्टीवर एमआयडीसी भोसरी पोलिसांनी छापा मारून (Moshi)कारवाई केली. त्यात 80 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला. ही कारवाई मंगळवारी (दि. 9) रात्री इंद्रायणी नदीच्या काठावर मोशी येथे करण्यात आली.

चंदू चिमा कुंभार (वय 47, रा. हवालदार वस्ती, मोशी) असे गुन्हा दाखल (Moshi)झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार नितीन खेसे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Chakan: पोलीस असल्याचे सांगून  झडतीच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाचे दागिने केले लंपास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चंदू कुंभार याने मोशी येथे इंद्रायणी नदीच्या काठावर बेकायदेशीरपणे हातभट्टी दारूची भट्टी लावली. त्याने 1600 लिटर गावठी दारू तयार करण्यासाठी रसायन एकत्र केले.

 

याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी कारवाई करत 80 हजारांचा ऐवज नष्ट केला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.