Pimpri : ‘शहराचा विकास साधताना नागरी सहभागाची आवश्यकता’

एमपीसी न्यूज – शहरातील नागरिकांना दर्जेदार सुविधा देण्याचे काम महापालिका (Pimpri)करत असते. शहराचा विकास साधताना नागरी सहभागाची अत्यंत आवश्यकता असते. यामध्ये विद्यार्थी महत्वाची भूमिका बजावत असतात.

त्यादृष्टीने शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यपद्धतीची (Pimpri)माहिती दिल्यास भविष्यातील पिढी जबाबदार नागरिक म्हणून निश्चितपणे निर्माण होईल तसेच त्यांच्या माध्यमातून नागरिकांमध्येही स्थानिक स्वराज्य संस्थाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोनामध्ये वाढ होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले.

प्रतिभा कॉलेज ऑफ एज्युकेशन या महाविद्यालयातील शिक्षणशास्त्र विषयाचे पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेस भेट दिली. या विद्यार्थ्यांसमवेत संवाद साधताना इंदलकर बोलत होते. महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये झालेल्या या कार्यक्रमावेळी विशेष अधिकारी किरण गायकवाड, महाविद्यालयाच्या प्रा. अरूंधती जाधव यांच्यासह विद्यार्थी मनिषा मोटे, मनीषा शर्मा, अश्विनी यादव, आम्रपाली डकारे, निकिता सोनी, सायली देशपांडे, महिमा सॅम, योगिता विचारे, सॅम्युएल लेट्टी, दीप्ती देशपांडे, विशाल गायकवाड, श्रीती शशीथल, वृषाली पवार आदी उपस्थित होते.

महापालिकेच्या विविध विभागांची तसेच महापालिकेच्या वतीने शहरात करण्यात आलेल्या विकास प्रकल्प आणि योजनांची माहिती सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी दिली. ते म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती ही स्थानिक पातळीवरील नागरिकांच्या मुलभूत गरजा आणि समस्यांवर काम करण्यासाठी झाली आहे. नागरिकांना केंद्रबिंदू मानून महापालिका काम करत असते. नागरिकांच्या समस्या सोडवित असताना महापालिकेचे विविध विभाग काम करत असतात. त्यांना सोपविलेली जबाबदारी पार पाडत असताना नियमांचे पालन करून नागरी हित डोळ्यासमोर ठेऊन तसेच लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन योजना, उपक्रम, प्रकल्प राबविले जातात.

दिवाबत्ती, पिण्याचे पाणी, प्राथमिक शिक्षण, आरोग्य, वैद्यकीय सुविधा अशा बाबींच्या सुविधा नागरिकांना देणे हे महापालिकेचे मुलभूत कर्तव्य आहे. लोकसेवकाने आपले कर्तव्य बजावत असताना नागरिकांच्या भावनांचा विचार करून त्यांच्या गरजांना प्राधान्य देत कामकाज केले पाहिजे. महापालिका आयुक्त स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासकीय प्रमुख असतात.

जनतेच्या हिताचे निर्णय घेत असताना सारासार विचार करून ते आपली भूमिका बजावत असतात. महापौर, नगरसदस्य तसेच लोकप्रतिनिधींचा देखील यामध्ये महत्वाचा सहभाग असतो.

Chakan: पोलीस असल्याचे सांगून  झडतीच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाचे दागिने केले लंपास

ही संपुर्ण प्रक्रिया विद्यार्थ्यांना शिक्षकांमार्फत समजल्यास ते सजग नागरिक बनतील. पर्यायाने शहराच्या विकासात त्यांचा सहभाग देखील वाढेल. याकरिता शिक्षकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे इंदलकर म्हणाले. कोरोनाकाळात प्रशासकीय कामकाज करताना आलेल्या आव्हानांबाबत सांगताना सह आयुक्त इंदलकर म्हणाले, महापालिकेच्या वतीने कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने चांगले काम केले.

शहरातील एकूण परिस्थिती हाताळण्यासाठी महापालिकेच्या सर्व विभागातील अधिकाऱ्यांनी अविरतपणे आपली सेवा बजावली. अनेक कठीण प्रसंगाना सामोरे जात कोविडसारख्या संकटावर यशस्वीपणे मात करण्यात महत्वाची भूमिका बजावली. यात नागरिकांचे सहकार्य देखील तितकेच महत्वाचे होते.

शहर स्वच्छ ठेवण्यामध्ये करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती देताना विशेष अधिकारी किरण गायकवाड म्हणाले, स्वच्छ शहरांच्या यादीत पिंपरी चिंचवड शहर देशपातळीवर यशस्वी काम करत आहे. स्वच्छतेमध्ये शहर पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक असतो. पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक या स्वच्छतेच्या चळवळीत सहभागी होत आहेत.

या चळवळीला व्यापक स्वरूप देण्यासाठी शहरातील विद्यार्थी पुढाकार घेत आहेत. हे आशादायी चित्र असून शहर स्वच्छ, सुंदर ठेवण्यास महापालिकेस यामुळे मदत होत आहे.

महापालिकेचे विविध विभाग, अधिकाऱ्यांकडे असलेल्या कामकाजाचे स्वरूप, विषय समित्यांचे कामकाज, महापालिका सभांचे नियम आदींबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.