Talegaon : नगरपरिषदेचा जेसीबी जळाल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने (Talegaon) एका ठेकेदाराला भाडे तत्वावर दिलेला जेसीबी जळून खाक झाला. ही घटना सोमवारी (दि. 8) रात्री साडेसात ते मंगळवारी (दि. 9) सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास मूरखळा घनकचरा संकलन केंद्र तळेगाव दाभाडे येथे घडली. याप्रकरणी अज्ञाताच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

ठेकेदार कंपनीचे व्यवस्थापक संदीप कोळेकर यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Sangvi : सांगवीत उद्यापासून पवनाथडी जत्रा; लावणी महोत्सवासह विविध कार्यक्रम

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कोळेकर हे अशोक इंटरप्रायजेस या कंपनीत व्यवस्थापक पदावर काम करतात. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने त्यांच्या कंपनीला भाडे तत्वावर जेसीबी (एमएच 14/जेयु 5271) चालवण्यासाठी दिला (Talegaon) आहे. त्यांनी जेसीबी तळेगाव दाभाडे घनकचरा संकलन केंद्रात पार्क केला होता. अज्ञाताने जेसीबीला आग लावली. यामध्ये जेसीबी जळून खाक झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.