Shivaji Rao Adhalrao Patil: माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांची शिवसेनेतून हकालपट्टी

पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका

एमपीसी न्यूज: शिरुर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील(Shivajirao Adhalrao Patil) यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.  त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. बंडखोर आमदारांनी वेगळी वाट पकडल्याने शिवसेनेने हकालपट्टीचे सत्र सुरू केल्याचे दिसत आहे. एकनाथ शिंदे गटात शामिल झाल्यानंतर त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. आता आढळराव पाटील यांच्या नंतर कोणाचा नंबर लागतो याकडे लक्ष लागून आहे.  शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी पत्रक काढून ही माहिती देण्यात आली आहे.

 एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर विविध स्तरातून एकनाथ शिंदे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाल्याचं पाहायला मिळालं.  अशातच शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी देखील सोशल मीडियावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा दिल्या. (Shivaji rao Adhalrao patil) यामध्ये त्यांनी ‘गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा अभिनंदन मुख्यमंत्री साहेब’ असं म्हटलं आहे. तसेच या पोस्टमध्ये आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कुठेही फोटो टाकला नाही.

Maharashtra Assembly Session : शिंदे-फडणवीस सरकारची आज पहिली चाचणी

कोण आहेत शिवाजीराव आढळराव पाटील

शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेचे मोठे नेते मानले जातात. पुणे जिल्ह्यात शिवसेना वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी 2004 मध्ये शिरुर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर विजय मिळवला होता. त्यानंतर 2009 आणि 2014 लोकसभा निवडणुकीत देखील त्यांनी विजय मिळवला होता. शिरुर लोकसभा मतदारसंघाचं पाटील यांनी 15 वर्ष प्रतिनिधीत्त्व केलं. शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून त्यांच्या संसदेतील कामगिरीनिमित्त त्यांना संसदरत्न पुरस्कार देखील मिळाला आहे. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अभिनेते अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांचा पराभव केला. हा पराभव आढळराव पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला गेला. आता आढळराव पाटील यांच्या हकालपट्टीनंतर मोठा शिरूर मतदारसंघाच काय होणार, त्याचे समर्थकही त्यांच्या सोबत जाणर का अश्या चर्चा सध्या रंगत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.