_MPC_DIR_MPU_III

Undri : लिफ्टमध्ये अडकलेल्या परदेशी इसमाची सुखरुप सुटका

एमपीसी न्यूज- चार मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर लिफ्टमध्ये अडकलेल्या परदेशी नागरिकाची कोंढवा बुद्रुक अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित सुटका केली. त्याबद्दल या नागरिकाने अग्निशमन दलाच्या जवानांचे आभार मानले

_MPC_DIR_MPU_IV

उंड्री येथील शांतिकुंज सोसायटीमध्ये गुरुवारी (दि. 17) रात्री 12 वाजता चार मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर टांझानियाचे रहिवासी असलेले 37 वर्षीय जॉन मोजो हे लिफ्ट बंद पडल्यामुळे अर्धा तास लिफ्टमध्ये अडकून पडले होते. स्थानिकांनी प्रयत्न करुन देखील लिफ्ट सुरू न झाल्याने तात्काळ अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात वर्दी देण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

कोंढवा बुद्रुक अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन टेरेसवरील लिफ्ट कॅट्रोल केबिनमध्ये जाऊन विद्युत पुरवठा बंद करून अग्निशमन उपकरणांचा वापर करीत अडकलेल्या जॉन मोजो यांची 10 मिनिटात सुखरूप सुटका केली. त्यानंतर घाबरलेल्या जॉन मोजो यांनी जवानांचे खूप आभार मानले.

कोंढवा बुद्रुक अग्निशमन केंद्रप्रमुख प्रकाश गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली फायरमन कैलास शिंदे, रफिक शेख, शंकर नाईकनवरे, राहुल जाधव, सुरज यादव, प्रदीप कोकरे यांनी ही कामगिरी केली.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.