Pune : रविवार पेठेतील बोहरी आळी येथे दुकानामध्ये आग; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंञण

एमपीसी न्यूज –    आज ( दि. 22 )  पहाटे 5 वाजताच्या रविवार पेठेतील बोहरी आळी रामसुख चेंबर्स येथील  शांती क्रॉकरी अँन्ड गिफ्ट आर्टिकल्स या दुकानाला  आग लागली. अग्निशमन दलाला वर्दी मिळताच  4 फायरगाड्या व 1 वॉटर टँकर घटनास्थळी रवाना करण्यात आला.आगीचे नेमके कारण समजले नसून या घटनेत कोणीही जखमी नाही.

आज ( दि. 22 )  पहाटे 5 वाजताच्या सुमारास रामसुख चेंबर्सच्या  तळमजल्यावर  शांती क्रॉकरी अँन्ड गिफ्ट आर्टिकल्स दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ . अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.  अग्निशमन दलाच्या जवानांनी  घटनास्थळी पोहचताच  कृत्रिम श्वसन उपकरण  परिधान करत प्रथम सदर इमारतीत किंवा दुकानामध्ये कोणी अडकले आहे का याची खाञी करुन चारही बाजूने आगीवर पाण्याचा मारा सुरू केला.

Talegaon Dabhade : मावळ लोकसभा मतदारसंघाचा आघाडीच्या बैठकीत आढावा

दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात मालाचा साठा असल्याने व आजुबाजूला इतर दुकाने व रहिवाशी घरे असून आग इतरञ पसरु नये याची दक्षता घेत जवानांनी सुमारे तासाभरात आगीवर नियंञण मिळवत मोठा धोका दुर केला. धुराचे प्रमाण मोठे असल्याने दलाकडून एक्झॉस्ट ब्लोअरच   वापर करण्यात आला .तसेच  रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.

घटनास्थळी आगीचे नेमके कारण समजले नसून सदर ठिकाणी सुदैवाने जखमी नाही. सदर व्यावसायिक इमारत ही तळमजला अधिक चार मजले असून या संपुर्ण इमारतीत विविध प्रकारची छोटी मोठी दुकाने आहेत.  या आगीमध्ये शांती क्रॉकरी अँन्ड गिफ्ट आर्टिकल्स या दुकानाचे पुर्ण नुकसान झाले असून दुकानातील सर्व माल जळाला आहे.

या आग विझविण्याच्या कामगिरीत अग्निशमन अधिकारी विजय भिलारे, पंकज जगताप, सुनिल नाईकनवरे तसेच वाहनचालक संदिप कर्णे, दत्तात्रय वाघ, अनिकेत ओव्हाळ, संदिप थोरात व जवान भाऊसाहेब चोरमले, भरत वाडकर, चंद्रकांत गावडे, आझीम शेख, दिगंबर बांदिवडेकर, गणेश कुंभार, गणेश लोणारे, संतोष अडाळगे, निकेतन पवार, अजय कोकणे, रिजवान फरास, रोहित मदनावाले, पंकज पाटील, अक्षय कांबळे यांनी सहभाग घेतला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.