Talegaon Dabhade : मावळ लोकसभा मतदारसंघाचा आघाडीच्या बैठकीत आढावा

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ मतदारसंघाचा( Talegaon Dabhade) आढावा घेण्यासाठी तळेगाव दाभाडे येथे बैठक पार पडली.या बैठकीत इंडिया आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. माजी मंत्री,शिवसेना उपनेते आमदार सचीन अहीर यांनी गाव भेटी दौऱ्या दरम्यान तळेगाव परिसरातील आघाडीतील विवीध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेउन विविध प्रश्नांवर चर्चा केली.

मावळ लोकसभा आढावा बैठक विशाल वाळुंज यांच्या  निवासस्थानी पार पडली. यावेळी इंडिया अलायन्स चे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. माजी मंत्री शिवसेना उपनेते आमदार सचीन अहीर यांनी गाव भेटी दौऱ्या दरम्यान तळेगाव परिसरातील आघाडीतील विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेउन विविध प्रश्नांवर चर्चा केली.

Today’s Horoscope 22 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आमदार अहिर यांनी माजी आमदार कृष्णराव भेगडे,ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, युवा काँग्रेसचे अध्यक्ष विशाल वाळुंज,अल्प संख्यांक सेलचे माजी अध्यक्ष आयुब शिकीलकर यांच्या निवासस्थानी जाऊन तालुक्यातील ( Talegaon Dabhade) विविध विषयांसह राजकीय वातावरणाबाबत माहिती घेऊन चर्चा केली. मावळ लोकसभा अहिर यांचे समवेत महिला जिल्हा संघटिका शैला खंडागळे,समन्वयक केसरीनाथ पाटील,मावळ प्रचार प्रमुख भारत ठाकूर,आशिष ठोंबरे,भूषण जगताप, मारुती खोळे,शांताराम भोते,युवराज सुतार,अनिकेत घुले,उमेश जावडे, संगीता सोनावणे,रुपाली अहिर, शांताराम तांबोळी,सतीश शेलार, रुद्रशीव भोसले,यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

काँग्रेसचे युवक अध्यक्ष विशाल वाळुंज यांचे निवास्थानी शाल श्रीफळ व पुष्पगुछ देऊन अहिर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शहरातील संरक्षण खात्याच्या वतीने संपादित जागेच्या प्रलंबित प्रश्नावर प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा केली. शंकर भेगडे, नंदकुमार कोतुळकर किरण मोकाशी, राम शहाणे, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेश वाघोले, काँग्रेसचे तालुका सरचिटणीस प्रताप हुंडेकरी उपस्थित होते.

यावेळी तालुक्यातील एम आय डी सी मधील फॉक्स कॉन कंपनी गेल्याच्या भूमिकेवर लोकप्रतिनिधींनी मौन बाळगले तर मिसाईल प्रकल्पाचा गेल्या 20 वर्षांपासूनचा प्रश्न सोडविण्यासाठी आजी माजी खासदार आमदार आदी लोकप्रतिनिधींनी बघ्याची भूमिका असल्याबाबत नाराजी व्यक्त करून याला वाच्या फोडावी अशी विनंती ( Talegaon Dabhade) केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.