Today’s Horoscope 22 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 22 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – सोमवार

तारीख – 22.04.2024.

शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.

आज विशेष – महादेवास दवणा वाहणे.

राहू काळ – सकाळी 07.30  ते 09.00.

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आज नक्षत्र – हस्त 20.00 पर्यंत नंतर चित्रा.

चंद्र राशी – कन्या.

—————————–

मेष ( शुभ रंग- तांबडा)

नोकरदारांना अधिकारी वर्गाकडून सन्मानाची वागणूक मिळेल. कार्यक्षेत्रात तुम्ही केलेल्या कष्टांचे फळ मिळेल. कामाच्या व्यापात तब्येतीच्या तक्रारी दुर्लक्षित करू नका.

वृषभ (शुभ रंग- पिस्ता)

उच्चशिक्षित मंडळींच्या महत्त्वकांक्षा व अपेक्षा वाढतील. आज तुमचा उच्च राहणीमाना कडे कल राहील. नवविवाहित मंडळींना बाळाच्या आगमनाची चाहूल लागेल.

मिथुन (शुभ रंग – मोरपंखी)

बरेच दिवसापासून दुर्लक्षित झालेल्या घरगुती कामांकडे आज लक्ष द्यावेसे वाटेल. मुलांचे लाड आवरते घेऊन त्यांच्या शिस्तीकडेही लक्ष द्यावे लागणार आहे.

कर्क ( शुभ रंग- मोतिया)

रिकामटेकड्या गप्पांमध्ये आज तुमचा बराचसा वेळ फुकट जाण्याची शक्यता आहे. तुमची काही गुपिते उघड होतील. कमी बोलून आज फक्त कृतीला प्राधान्य देणे गरजेचे असेल.

सिंह ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आज कुटुंबीयांच्या वाढत्या गरजा भागवण्यासाठी पैशाची कमतरता भासणार नाही. गृहिणी अनपेक्षित पणे येणाऱ्या पाहुण्यांची उठबस अगदी आनंदाने करतील.

कन्या (शुभ रंग- भगवा)

आज तुम्ही एखादी गोष्ट फारच मनाला लावून घ्याल. बरेच दिवसापासून गहाळ झालेली एखादी वस्तू आज घरातच सापडेल. आपल्या आवडत्या छंदाला वेळ द्याल.

तूळ (शुभ रंग- गुलाबी)

दिवस खर्चाचा असताना बिनधास्त खर्च करायला हवा. आज कंजूषणाचा काहीही उपयोग नाही. तातडीने दुरच्या प्रवासाला निघणाऱ्यांनी मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी.

वृश्चिक ( शुभ रंग- जांभळा)

दिवस लाभाचा असताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. दिवसाच्या उत्तरार्धात एखादा लाभ संभवतो. जुन्या मित्रमंडळींच्या सहवासात संध्याकाळ मजेत जाईल.

धनु (शुभ रंग- आकाशी)

नोकरदारांना आज वरिष्ठ गोड बोलून राबवून घेतील. खोटी स्तुती करणारे मित्र भेटतील. नोकरीत साहेब जितके विचारतील तितकेच बोला. लवकर घर गाठा.

मकर (शुभ रंग- निळा)

दूरचा प्रवासात झालेल्या काही नव्या ओळखी पुढील काळात व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने फायदेशीर ठरतील. जेष्ठ मंडळी आज तीर्थयात्रेचे बेत आखतील.

कुंभ ( शुभ रंग- पांढरा)

महत्त्वाच्या कामात थोडेफार अडथळे येतील. आज आपल्या आवाक्याबाहेरच्या जबाबदाऱ्या स्वीकारूच नका. मोठ्या रकमेची ने आण करताना सावध असावे.

मीन – ( शुभ रंग- केशरी)

उद्योगधंद्याच्या ठिकाणी अनुकूल वातावरण राहील. आज समोर येणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्याच प्रभावात राहील. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या विचाराने घ्या.

शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार 

9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.